मुल पोलीस स्टे. ची दबंग कारवाई 61 गोवंशीया सह 3320000 रुपयाचा मुद्देमाल जप्त.

 मुल पोलीस स्टे. ची दबंग कारवाई 61 गोवंशीया सह 3320000 रुपयाचा मुद्देमाल जप्त.


एस.के.24 तास


मुल : ( नितेश मँकलवार ) गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना माहिती मिळाली की काही इसम दोन ट्रकमध्ये अवैध्यरित्या जनावरे कोंडून सावली कडून येत असून चांदापूर फाटा, फिस्कृटी मार्गे गडचांदूर कडे जात आहे व समोर एका लाल रंगाच्या कारने पायलटिंग करत आहे. अश्या माहिती वरून तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी हे रात्री 10:30 वाजता पासून गडीसुर्ला ते फिस्कृटी रोडवर नाकेबंदी केली असता मिळालेल्या माहितीप्रमाणे समोरून एक चारचाकी वाहन येताना दिसले.  सदर चारचाकी वाहनास पोलिसांनी हात दाखवून थांबवण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन पोलिसांजवळ थांबविले असता सदर कार ही लाल रंगाची मारुती सुझुकी कार क्रमांक mh01-bf 1590 ही होती.पोलीस कर्मचा-यांनी आपापली ओळख दिली. व कार चालकास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव अब्दुल जुबेर अब्दुल रशीद वय 32 वर्ष वॉर्ड क्र.4 गडचांदूर ता.कोरपना जिल्हा चंद्रपूर असे सांगितले सदर कार ही मुखबीरने सांगितल्या प्रमाणे असल्याने त्याला बाजूला थांबविले असता लगेच त्याला मागोमाग दोन ट्रक येत असल्याचे दिसले व दुरूनच ट्रकचे लाईटमध्ये पोलिसांना पाहुन चालकांनी दोन्ही ट्रक थांबविले व रोडावरच ट्रक बंद केले.ट्रक समोर येत नसल्याने पोलीस कर्मचाऱ्यी ट्रक जवळ गेले  असता सदर ट्रक हे आयचर क्र. Mh-34bg-1813 व क्र. Mh34bg-8714 रोवडर उभे करून दोन्ही ट्रक चे चालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले होते. सदर ट्रकची पंच सक्षम पाहणी केली असता आयचर ट्रक क्रमांक mh34- bg -1813मध्ये 25 नग गाय व 6 बैल असे एकूण 31 व आयचर ट्रक क्रमांक mh-34 -bg-8714 मध्ये 25 नग गाय व 5 बैल असे एकूण 30 दोन्ही ट्रकमधील एकूण 61 गोवंशीय जनावरे किंमत 610000 रुपये तसेच दोन्ही ट्रक किंमत 2200000 रुपये पायटिंग करिता वापरलेली कार किंमत 500000 रुपये आरोपींचा मोबाईल किंमत 10000 रुपये असा एकूण 3320000 रुपयाचा मुद्देमाल पंचनामा कारवाई करून जप्त करण्यात आला.दोन्ही ट्रकमधील एकूण 61 गोवंशीय जनावरांना सुरक्षेच्या दृष्टीने श्रीकृष्णा गोशाळा व सेवा संस्था, गोंडपिपरी येथे दाखल करण्यात आले. 


   सदरची कारवाही ही सहाय्यक पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक राजपूत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राठोड, पोलीस कर्मचारी चिमाजी, श्रावण, महेश, शंकर तिडके यांनी केली. आरोपी विरोधात मुल पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास मुल पोलीस स्टेशन करीत आहे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !