प्रधानमंत्री विमा योजना मंजूर - वारसांना मिळाले 2 लाख रुपये.

प्रधानमंत्री विमा योजना मंजूर - वारसांना मिळाले 2 लाख रुपये.


एस.के.24 तास


सावली : बँक ऑफ महाराष्ट्र सावलीच्या शाखेत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत मृत्यू दावा मंजूर करण्यात आला असून सभापती विजय कोरेवार यांच्या प्रयत्नाने वारसांना 2 लाख रुपये विमा रक्कम देण्यात आला.

       प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत राष्ट्रीयकृत खातेदारांसाठी विमा योजना आहे. या योजनेत 18 ते 50 वर्ष वयाचे खातेदार विमा योजनेत समाविष्ठ होऊ शकतात.  वर्षाला 330 रुपयात कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास 2 लाखाचा विमा व वर्षाला 12 रुपयात अपघाती मृत्यू झाल्यास 4 लाखाचा विमा योजना  विमा आहे. खेडी येथील मृतक विलास मोहूर्ले यांनी 330 रुपयांचा विमा बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतून काढला होता. त्याचा ऑगस्ट 2020 मध्ये शेतात करंट लागून मृत्यू झाला. पंचायत समितीचे सभापती विजय कोरेवार यांनी विमा दाव्यासाठी पाठपुरावा करून त्याचे वारसांना विमा रक्कम मिळवून देण्यास मदत केली. मृतकाचे वारस सौरभ मोहूर्ले याचे खात्यात 2 लाख रुपये विमा दाव्याची रक्कम जमा करण्यात आली. यावेळी सभापती विजय कोरेवार, बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक प्रशांत  झाडे, सहायक व्यवस्थापक अमोल यांनी खात्यात रक्कम जमा केली. बँक ऑफ महाराष्ट्रचे खातेदारांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ कुटुंबाला होण्यासाठी विमा काढून घेण्याचे आवाहन बँक व्यवस्थापक प्रशांत झाडे यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !