लाखनी येथील महामार्गावर वाहतूक प्रभावित.
एस.के.24 तास
भंडारा : (मुकेश मेश्राम) लाखनी शहरात सध्या उड्डाण पुलाचे कामे सुरू आहेत. उड्डाणपुलाचे काम करताना रस्त्याची तोडफोड करण्यात आली आहे.कामाला गती नाही.
कंत्राटदार आपल्या मनमर्जीने कामाला गती देत आहे.रस्ते फोडताना मात्र कुठलेही नियोजन केलेले नाही.त्यामुळे फोडलेल्या रस्त्यांवरच पावसाचे पाणी साचत आहे.
लाखनी शहराची ही अवस्था झाली आहे.रस्त्यावरील पावसाचे पाणी जायला मोठ्या नाल्यांचे बांधकाम करण्यात आले.परंतु त्याची मान्सूनपूर्व सफाई झालेली नाही.अशा परिस्थितीत सामान्य जनतेच्या आरोग्याशी कंत्राटदार खेळत आहे.
यामुळे परिसरात जीवघेणे अपघातदेखील वाढले आहेत.लाखनी शहरात उड्डाणपुलाचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. पुलाच्या बांधकामाकरिता ठिकठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत.
लोकांचे दुकाने तोडून उड्डाण पुलाची निर्मिती होत आहे.मागील ३ वर्षापासून हे काम सुरू आहे.नियोजन नसल्याने काम दिवसेंदिवस प्रलंबित राहत आहेत.कामात गती नसल्यामुळे महामार्गाची मात्र पूर्णपणे दुर्दशा झाली आहे.
खड्यामधील पाण्यामुळे महामार्ग दिसेनासा होतो. वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.अशा वेळी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.महामार्गाची पूर्णपणे दुर्दशा झाली असतानाही दुर्लक्ष का होत आहे.
असा संतप्त सवाल वाहनधारक विचारत आहेत.रस्त्याच्या मधोमध बांधकामाचे साहित्य पडलेले दिसते.तसेच कोणत्याही ठिकाणी स्पीड ब्रेकरचे बोर्ड न लावताच उभारले जात आहेत.