नियमित योगा करून आरोग्य सांभाळावे शाखा प्रमुखाचे आवाहन.
एस.के.24 तास
गडचिरोली : आजच्या आधुनिक धावपळीच्या जीवनात योगाला अन्न साधारण महत्व प्राप्त झाले आहे. निरोगी व उत्तम आरोग्यासाठी व्यायामाची सगळ्यांना नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे नियमित योगाकरुन आरोग्य सांभाळावे असे शाखा प्रमुखां यांनी केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वेगवेगळ्या युवा संकल्प शाखा ठिकाणी योगा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी युवकांना मार्गदर्शन करताना शाखा बोलत होते.
या वेळी वेगवेगळ्या युवा.संकल्प शाखा प्रमुख व यांनी योगा कार्यक्रमात सहभागी होऊन योग निमित्त स्वतः १ तास योगा करून उत्तम आरोग्यासाठी नियमित योगा करण्याचा युवकांना संदेश दिला. युवा संकल्प शाखा भेंडाळा, युवा संकल्प शाखा जैरामपुर, युवा संकल्प शाखा वाघोली, युवा संकल्प शाखा नवेगाव माल ,युवा संकल्प शाखा फोकुर्डी या प्रसंगी प्रसंगी वेगवेगळ्या शाखा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली योग दिन साजरा करण्यात आला.