पालांदूर परिसरासह तालुका भर चालतात विना क्रमांकाचे ट्रॅक्टर.
एस.के.24 तास
भंडारा : ( मुकेश मेश्राम ) लाखनी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या पालांदुर परिसरात आजच्या घडीला शेकडो ट्रॅक्टर रस्त्यावर धावत आहेत.यातील अनेक ट्रॅक्टर व ट्रॉलींना नंबरच नसल्याचे दिसून येत असून सुद्धा पोलीस व परिवहन विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने अशा ट्रॅक्टरमुळे मुरमाडी/तुप येथे झालेल्या जीवघेन्या अपघाताने गमावलेला जीव परत येईल काय ? यात दोषी ठरवायचे कुणाला ?असा प्रश्न पालांदुर परीसरात चर्चेला जात आहे.शेतीच्या कामासाठी आजच्या घडीला अनेक शेतकरी ट्रॅवटरचा उपयोग करतात.याचबरोबर शेतीसाठी वापरावयाचे साहित्य इतरत्र नेण्यासाठी व इतर कामांसाठी सुद्धा ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो.परिसरात ट्रॅक्टर वापरणारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून दिवसेंदिवस ती बाढतीवरच आहे.याच विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर व ट्रॉलीद्वारे गौण खनिजाची बेकायदा वाहतूक सुद्धा केली जात असल्याने ट्रॅक्टर व ट्रॉलीना नंबर प्लेट नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. प्रत्येक बाहनावर नंबर लिहिणे बंधनकारक आहे परंतु पालांदुरातील व परिसरातल्या ग्रामीण भागातील ट्रॅक्टरना हा नियम लागू नाही का ? असा प्रश्न इतर वाहतूकदार करताना दिसतात. पालांदुर परिसरात ह्याच विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून बेकायदेशीररित्या रेती,मुरुम व तत्सम गौण खनिजाची तस्करी खुलेआम महसुली व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आशिर्वादाने सर्रास केली जात आहे.या ट्रॅक्टरवर क्रमांकय नसल्याने नागरिक अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी तक्रार करू शकत नाहीत.या बाबत माहिती प्रकाशित झल्यावर सुद्धा पोलीस व महसूल विभागाकडून कसलीच कारवाई होत नसल्याने संबंधित विभाग व रेती तस्करांमध्ये आर्थिक देवाण घेवानीचे 'मधूर' संबंध असल्याचा नागरिकांचा सरळ आरोप आहे. क्षमतेपेक्षा जास्त गौण खनिज भरून नेणे,रात्रीची वाहतूक करणे,वन विभागाच्या हद्दीतून गौण खनिजाचे उत्खनन करून वाहतूक करणे.असे कित्येक प्रकार परिसरात सर्रास सुरु आहेत.याकरिता पोलीस विभाग,वनविभाग,महसूल विभाग व परिवहन विभागांनी संयुक्त कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.