ब्रेकिंग न्युज...
कोंडेखल तलाव केरोडा रोड वळणावर दुचाकी चा आमोरा - समोर भीषण अपघात.दोन जण गंभीर जखमी.
सुरेश कन्नमवार मुख्य संपादक -एस.के.24 तास
सावली : दिनांक.28/06/2021 ला 5 :30 वाजता च्या सुमारास कोंडेखल तलाव केरोडा रोड वळणावर दुचाकी चा आमोरा - समोर भीषण अपघात झाला जोरदार टक्कर होऊन दोघे गंभीर जखमी झाले.कोंडेखल वरुन केरोडा कडे राजू चलाख हे जात असताना.विरुद्ध दिशेने येणारे कालिदास भोयर,(वय 25 वर्षे ) गणेश गेडाम (वय 27) हे दोघे मु,टेकाडी ता,मुल जिल्हा,चंद्रपूर हे कोंडेखल कडे मधधुंद अवस्थेत गाडी वर येत होते.
आणि राजू चलाख (वय,50 वर्ष) हे आपल्या दुचाकीने कामानिमीत्य कोंडेखल ला आले होते.या दोन्हा दुचाकी मध्ये समोरा - समोर जोरदार टक्कर झाली.
या घटनेत टेकाडी येथील गणेश गेडाम व राजू चलाख चा गंभीर जखमी झाले.जखमी असून त्यांचेवर उपजिल्हा रुग्णालय सावली येथे उपचार सुरु आहे.