युवा संकल्प संस्था विदर्भ (महाराष्ट्र राज्य) आणि केवळरामजी हरडे महाविद्यालय यांचे रक्तदान शिबिर यशस्वी.

युवा संकल्प संस्था विदर्भ (महाराष्ट्र राज्य) आणि केवळरामजी हरडे महाविद्यालय यांचे रक्तदान शिबिर यशस्वी.



प्रशांत चुधरी एस.के.24 तास                            तालुका प्रतिनिधी,चामोर्शी                                    मो.नं : - ७४९९७१६१०७.


चामोर्शी : युवा संकल्प संस्था शाखा चामोर्शी तसेच केवळरामजी हरडे महाविद्यालयात यांच्या संयुक्त विद्यमानाने दि.७ जून २०२१ ला हरडे महाविद्यालयात रक्तदान शिबीर घेण्यात आले त्यामध्ये २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या संपूर्ण कार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे डॉक्टर पवन रमेश नाईक, कार्यक्रम अधिकारी तसेच विभागीय समन्वयक रासेयो गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांचे विशेष सहकार्य प्राप्त झाले.२०१७ पासुन युवा संकल्प संस्था ही सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे आणि आता पर्यंत संस्थेच्या माध्यमातून ६०० रुग्णापर्यंत रक्त पोहचवण्याचे काम यु.स.स.वि.म.राज्य उपाध्यक्ष रक्तनियंत्रक मा.चेतनजी कोकावार यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत काळजीपूर्वक पार पाडले आहे. युवा संकल्प संस्था ही संपूर्ण विदर्भ  मध्ये स्थापित केली गेली आहे प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये गावागावांमध्ये त्यांचे ग्रुप आहेत.


त्या मधील एक ग्रुप म्हणजे चामोर्शी ग्रुप यांच्या नेतृत्वाखाली काल रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आणि ते यशस्वीरित्या पार पाडले त्यावेळेस उपस्थित मा.श्री. रमेशजी बरसागडे कृषी सभापती जिल्हा परिषद गडचिरोली,मा.श्री. डॉ.हिराजी बनपूरकर प्राचार्य के.ह.म.चामोर्शी, मा.श्री.साईनाथजी बुरांडे भाजपा महामंत्री,मा.श्री.भास्करजी बुरे, डॉ. महेश जोशी, डॉ. पवन र. नाईक, प्रा. गणेश दांडेकर, प्रा. महादेव सदावर्ते,श्री अविनाश चौधरी,युवा संकल्प संस्था विदर्भ महाराष्ट्र राज्य संस्थापक, अध्यक्ष मा.राहुलजी वैरागडे,उपाध्यक्ष मा.चेतनजी कोकावार,यु.सं.ग्रुप चा.प्रमुख मा.सूरज नैताम,     उपप्रमुख मा.प्रशांत चुधरी,क्रीडा प्रमुख मा.सुबिर मिस्त्री,विभागीय प्रमुख मा.अश्रुत दुर्गे,सोशल मिडिया प्र.प्रशांत कुसराम,क्रांती तुंबडे, प्रनिल कुकुडकार नंदकिशोर सातपुते, राहुल चीचघरे, मंगेश बावणे,सौरभ कोकावार तसेच यु.सं. सर्व सदस्य व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !