कोविड १९ लसीकरणाची जनजागृती. - डॉ.पवन नाईक सर
प्रशांत चुधरी एस.के.24 तास तालुका प्रतिनिधी,चामोर्शी मो.नं : - ७४९९७१६१०७
चामोशी : दिनांक ०८/०६/२०२१ रोजी मुरखळा चक येथे झालेल्या लसीकरणा मध्ये युवा संकल्प संस्था गडचिरोली आणि केवळरामजी हरडे महाविद्यालय चामोर्शी येथील शिक्षक डॉ.पवन नाईक सर आणि युवा संकल्प संस्था शाखा बोरी चे प्रमुख प्रणिल तुमदेव कुकडकार यांच मोलाच योगदान आहे. मुरखळा चक येथे लोकांच्या मनात लसीकरणा बद्दल गैरसमज समज आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते तर डॉ.पवन नाईक सर आणि प्रणिल तुमदेव कुकडकार यांनी लोकांच्या मनत असलेले गैरसमज समज आणि भीती दूर करण्यासाठी दिनांक ०७/०६/२०२१ रोजी रात्रौ ०८.०० वाजता प्रोग्राम घेऊन प्रोजेक्ट द्वारे विडिओ आणि स्लाइड दाखवून लोकांच्या मनतील गैरसमज आणि भीती दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आले.
या प्रोग्राम मुळे मुरखळा चक येथे झालेल्या लसीकरणा मध्ये ज्यांना बोलत येत नाही ,अपंग असलेले आणि ज्यांचे वय ८० वर्ष पेक्षा जास्त होते असे महिला आणि पुरुष लस कोरोनाची घेण्यासाठी आले होते.
डॉ. पवन नाईक सर आणि युवा संकल्प बोरी चे प्रमुख प्रणिल तुमदेव कुकडकार स्वतः लसीकरण सेंटर वर उपस्थित होते व डॉक्टरांची मदत केली आणि कोरोनाची लस घेण्यासाठी आलेल्या व्यक्तींची मदत केली व सामाजिक दुरिचा पालन करण्यासाठी लसीकरण होई पर्यंत सांगत होते
ज्यांनी अजून पर्यंत कोरोनाची लस घेतली नाही त्यांनी मनात कोणत्याही प्रकारचे गैरसमज आणि भीती न बाळगता कोरोनाची लस घ्यावी ही विनंती.याच्यात मदतीसाठी आलेले केवळरामजी हरडे महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि युवा संकल्प चे सदस्य चेतन सरपे,प्रसिद्ध कोसमसिले ,टीया बुरांडे,अनुप सरपे, पंकज पिठाले क्रिश सरपे आणि आदित्य ठाकूर उपस्थित होते.