खनिज क्षेत्र कल्याण निधीतून शेतक-यांसाठी भात रोवणी यंत्र उपलब्ध. ◆ शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत संपर्क करण्याचे आवाहन.

खनिज क्षेत्र कल्याण निधीतून शेतक-यांसाठी भात रोवणी यंत्र उपलब्ध.

◆ शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत संपर्क करण्याचे आवाहन.

       
        सुरेश कन्नमवार
मुख्य संपादक - एस.के.24 तास



चंद्रपूर : भात हे बहुगुणी तृणधान्य पीक म्हणून ओळखले जाते. चंद्रपूर जिल्हा भात उत्पादनाकरीता प्रसिध्द असून जिल्हयात सन 2020-21 या खरीप हंगामात 1 लक्ष 82 हजार 118 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली. पारंपरिक पध्दतीमध्ये भात पीक घेण्याकरीता वेळेवर व पुरेशा प्रमाणात शेत मजूर उपलब्ध होत नसल्याने रोप लावणी उशिरा होते. परिणामी उत्पादनात घट होते. यावर मात करण्यासाठी जि.प. कृषी विभागाच्यावतीने प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण निधी योजनेंतर्गत तरतूद करण्यात आली आहे. आधुनिक पध्दतीने भात पिकाची शेती करणाऱ्याकरीता शेतमाल उत्पादक कंपनीमार्फत शेतकऱ्यांना एकूण 50 भात रोवणी यंत्र   (नर्सरी) ट्रे सह  उपलब्ध करून दिले आहे.



सुधारीत भात पीक लागवड तंत्रज्ञानांतर्गत भात रोवणी यंत्रासारख्या सुधारीत औजारांच्या वापरामुळे लागवडीचा वेळ व मनुष्यबळाची बचत होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यात भात पिकाची उत्पादकता वाढण्यास मदत होईल. या आधुनिक पध्दतीचा अवलंब करून बियाणे ट्रे मध्ये पेरणी केल्यास एकरी 10 ते 12 किलो बियाण्यांमध्ये  15 ते 20 दिवसांत सुदृढ रोपे तयार होतात. सदर पध्दतीमध्ये  ट्रे मध्ये बियाणे लागवड केल्यास एक सारखी रोपे कमी कालावधीत तयार झाल्यामुळे योग्य वेळेत लागवड करता येते. तसेच वेळेची बचत होऊन 1 एकर भात क्षेत्राची 2 तासात लागवड होते. एका भात रेापाला 45 ते 50 फुटवे निघतात व सदर सुधारीत लागवड पध्दतीमध्ये दोन झाडामधील व दोन ओळीतील अंतर योग्य व एकसारखे असल्याने रोग व किडीचे प्रमाण कमी असते.


भात लोंब्याची प्रति एकर संख्या जास्तीत जास्त असल्यामुळे सरासरी हेक्टरी 10 ते 15 क्विंटलने उत्पादनात वाढ होते. सुधारीत भात पीक पध्दतीमध्ये वेळेत तंत्रशुध्द पध्दतीने लागवड झाल्यामुळे  लागवडीच्या एकरी खर्चामध्ये दीड हजारापर्यंत बचत होऊ शकते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी भात रोवणी यंत्राच्या साहाय्याने भात पिकाची लागवड करावी. हे यंत्र खालील शेतकरी उत्पादक कंपनी यांच्याकडे उपलब्ध आहे. त्यांच्याशी संपर्क साधून भात रोवणी यंत्र भाडयाने प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

यांच्याकडे आहे यंत्राची उपलब्धता : भात रोवणी यंत्र भाडयाने प्राप्त करुन घेण्याकरीता, चंद्रपुर गडचिरोली फार्मर प्रोडयुसर कंपनी, सावली (चेतन रामटेके 9922735330), संगोपन फार्मर प्रोडयुसर कंपनी, मुल (सचिन घाटे 9765301050), कवडु ॲग्रो फार्मर प्रोडयुसर कंपनी, मुल  (नितेश ऐनप्रेडडीवार 9763427506), झाडीपटटी शेतकरी फार्मर प्रोडयुसर कंपनी, सिंदेवाही (राजेश केळझरकर 9011124096), जीवनसमृध्दी कृषी विकास आदिवासी फार्मर प्रोडयुसर कंपनी, खडसंगी (गुरुदेव नंदरधने 8390499242), नागभीड फार्मर प्रोडयुसर कपंनी, नागभीड (भोजराज ज्ञाननबोनवार 9423642564), भुमीपुत्र शेतकरी प्रोडयुसर कंपनी, राजुरा (विजय वाघमारे  9021836527), ब्रम्हपुरी फार्मर प्रोडयुसर कपंनी, ब्रम्हपुरी (केशव मशाखेत्री 9595532547), ग्रामसमृध्दी कृषि विकास आदिवासी फार्मर प्रोडयुसर कंपनी, चंदनखेडा (महेश नागापुरे 8668959375)


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !