कोरोना काळात उपसरपंच प्रफुल तुम्मे यांची दमदार कामगिरी.
एस.के.24 तास
सावली : साऱ्या जगाला बंदिस्त ठेवणारा रोग म्हणजे कोरोना मागील वर्षा पासून आपण कोरोना या रोगाच्या उपस्थितीत जगत आहोत सारा महाराष्ट्र बंदिस्त असतांना सुद्धा या कोरोना च्या काळात पाथरी गावातील उपसरपंच मा. प्रफुल भाऊ तुम्मे यांनी न डगमगता आपली टीम तयार करून सम्पूर्ण पाथरी गावात कोरोना विषयीचा गैर समज दूर करून गावातील लोकांना कोरोना टेस्ट करण्यासाठी प्रोत्साहित केले, पण कोरोना टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर पेशंट ला तालुक्याच्या ठिकाणी पाठवावे लागत असे त्यामुळे पेशंट ला कधी बेड मिळत नव्हते त्यामुळे बरेच पेशंट दगावले सुद्धा अशा वेळेस मा. प्रफुल भाऊ तुम्मे यांनी पाथरी गावातील आणि आजूबाजूच्या परिसरातील गरज लक्षात घेता स्वबळावर पाथरी गावात ५० बेड चे कोवीड सेन्टर उभारण्यात आले आणि पाथरी आणि परिसरातील कोरोना पेशंट ची दमछाक थांबली .इथेच न थांबता प्रफुल भाऊ यांनी आमदार खासदार यांच्या सोबत वारंवार वार्तालाब करून ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन कोवीड सेन्टर ला उपलब्ध करून दिली.या दरम्यान दररोज कोरोना पेशंट ची स्वतः जाऊन चौकशी करीत आणि पेशंट चे मनोबल वाढवण्यास मदत करीत. पाथरी गावात कोविड सेन्टर ची स्थापना करून कोरोना पेशंट ला कोरोना आजारातून पूर्ण पणे बरा होण्यासाठी आणि पेशंट ला मानसिक त्रास होऊ न देण्याचा अहोरात्र मनापासून पूर्ण प्रयत्न केले.आणि ते प्रयत्न पूर्ण पणे फळाला लागले.आज कोविड सेन्टर पूर्ण पणे खाली आहे.
हे काम संपत नाही तोच आज पासून पाथरी गावातील घरकूल योजना आणि ज्यांचे जॉब कार्ड चे काम बाकी राहिले आहेत त्यांना ग्राम पंचायत मध्ये बोलवून स्वतःच्या समक्ष कागदपत्रे तपासून आणि रोजगार सेवकाला योग्य ते मार्गदर्शन करून गावातील लोकांचे अपुरे राहिलेले कामे पूर्ण करण्यास सदैव तत्पर आहेत अशी भावना पाथरी आणि परिसरातील गावातील जनता व्यक्त करीत आहे.