निरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे. - अनुप कोहळे

निरोगी आणि सदृढ आरोग्यासाठी नियमित योग करावे. - अनुप कोहळे


एस.के.24 तास


चामोर्शी : ( प्रशांत चुदरी ) छत्रपती शिवाजी युवा मंडळ राजनगट्टा,च्या वतीने 21 जून " आंतरराष्ट्रीय योग दिनाचे " औचित्य साधून 3 दिवशीय योग शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंडळाचे सचिव अनुप कोहळे उपस्थित होते. यावेळी त्यांनी उवस्थितांना विविध योगांचे प्रात्यक्षिक व त्याचे फायदे सांगितले.व विविध विषयांवर मार्गदर्शन केले. फक्त आजच्या दिवशी योग करून आपले आरोग्य सुदृढ होणार नाही तर त्याकरिता नियमित योग आणि संतुलित व पौष्टिक आहार घ्यावा लागेलं असे प्रतिपादन त्यानी केले. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष,राजू सोमनकर,सदस्य,आदित्य सातपुते, गणराज चीचघरे,नीरज कोहळे,आदी युवक व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !