कोरोनाचासंभाव्य धोका अजूनपर्यंत गेलेला नाही लसीकरण करून घ्या. - तहसीलदार मल्लिक विराणी
एस.के.24 तास
भंडारा : ( मुकेश मेश्राम ) कोरोना संसर्गाच्या नियंत्रणा करिता प्रत्येक नागरिकांनी शासनाने पुरविलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करणे अत्यावश्यक आहे. मात्र,काही नागरिक,व्यापारी व ग्राहक बेफिकीरपणे वागतात.अनलॉक असताना कोरोनाचे संकट वाढू नये,याकरिता जनतेने सहकार्य करावे.कोरोना अजून संपलेला नसून,लशीकरन करुन स्वतःची व इतरांची काळजी घेण्याचे आवाहन मल्लिक वीरानी तहसीलदार लाखणी यांनी मुरमाडी/तुप येथील रूट मार्च प्रसंगी केले.
तालुक्यातील जनसामान्यांना अनलॉकमध्ये काय काळजी घ्यायची आहे,यावर प्रशासनाच्या वतीने प्रत्येकाने मार्गदर्शन केले.
विनामास्क असणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात आली.दुकानदार,व्यापारी यांना समज देण्यात आली.वेळेचे बंधन सर्वांनाच पाळण्याचे आवाहनसुद्धा करण्यात आले. शासनाच्या नियमा प्रमाणे मुरमाडी/तुप बाजारपेठ बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.ठाणेदार तेजस सावंत यांनी नियम न पाळणाऱ्यांवर सक्त कारवाई केली जाईल,अशी तंबी दिली. गावातील 45 ते 60 वयोगटातील सर्व नागरिकांना लस देणे आवश्यक आहे स्थानिक प्रशासनाने गावातील प्रत्येक घरात जाऊन लसीकरणा करिता प्रोत्साहीत करा अशा सूचना खंडविकास अधिकारी शेखर जाधव स्थानिक प्रशासनाला दिल्या त्यांनी मुरमाडी/तुप येथे रूट मार्चप्रसंगी बस स्टॉप चौकात नागरिकांना प्रबोधन केले. इंदिरा गांधी विद्यालय ते बस स्टॉप चौकापर्यंत असा दीड किलोमीटर किलोमीटरचा रूट मार्च पार पडला.
यावेळी लाखणी तालुक्याचे तहसीलदार मल्लिक विराणी ,खंडविकास अधिकारी डॉक्टर शेखर जाधव,पालांदुर पोलीस स्टेशन चे ठाणेदार तेजस सावंत, प्राथमिक आरोग्य केंद्र मुरमाडी/तुप वैद्यकीय अधिकारी सोहम मरस्कोल्हे ,सरपंच ताराचंद निरगुडे ,आशा सेविका बँक सखी,बचत गट प्रतिनिधी,तंटामुक्ती समितीचे सर्व सदस्य, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सदस्य गण ,आरोग्य विभाग महसूल विभाग आणि पोलिस विभागाचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.