मॅजिक बस इंडिया फाउंडेशन गडचिरोली तर्फे जेप्रा व खरपूंडी येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा.


 मॅजिक बस इंडिया फाउंडेशन गडचिरोली तर्फे जेप्रा व खरपूंडी येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा.


एस.के.24 तास


गडचिरोली : मॅजिक बस इंडिया फाउंडेशन गडचिरोली, टाटा प्रकल्प' सर्वांगिण शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गडचिरोली तालुक्यातील जेप्रा व खरपुंडी गावांमध्ये विविध कार्यक्रमाच्या च्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला.पर्यावरणाशी संबंधित विविध विषय,घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल जागरूकता निर्माण करने आणि महत्वाच्या बाबींविषयी तातडीने पाऊल उचलने असा हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू आहे.त्यामध्ये मुलांनी वृक्षांना राखी बांधून त्याची रक्षणाची जबाबदारी घेतली व पालकांनी त्या वृक्षांचे महत्त्व व फायदे हे सजीव सृष्टीला किती महत्वाचे आहे हे त्यांनी आपल्या मनोगताद्वारे व्यक्त करून त्यांनी आपल्या घरी वृक्षारोपण केले.पर्यावरणाला धोका असणाऱ्या प्लास्टिक वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी मुलांनी ओला व सुखा कचरा अशा कचरा पेटी तयार करून त्या त्यांचा वापर आपल्या सुखा आणि ओला कचरा वेगवेगळा करण्यासाठी घरी वापरनार आहेत व प्लास्टिक बाटल चा पुनर्वापर करून त्यात वेलींची व फुलांची झाडे लावण्यात आलेली आहेत.


सोबतच मुलांनी फळांची झाडे व त्या फळांमार्फत मिळणारे विविध जीवनसत्त्वे आपले आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे मुलांनी मनोगत व्यक्त केले.सोबतच कोरोना काळात झाडे किती महत्वाची आहेत याचे महत्व लक्षात घेऊन आणि झाडांमधून जीवनसत्त्वे मिळणारी फळे देखील रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी गरजेची आहे याची जनजागृती मुले व पालक यांच्यासोबत करण्यात आली.या कार्यक्रमाला  उपस्थित. सरपंच-सौ शसिकलाताई झंझाड,

पोलीस पाटील- श्नी धर्मेंद्र गोवर्धन,तं.मु.स. अ. श्री देवानंद चालख,श्री.मनोहरजी झंझाड( माजी सभपती)प्रतिष्ठित नागरिक.श्री गुणाजी देशमुख (माजी उप सरपंच) सौ.निताताई झंझाड( अशा वर्कर),श्री.अभिजीत म्हशाखेत्री,उपस्थित होते.

सदर उपक्रम यशस्वी करण्याकरिता मॅजिक बस संस्थेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे,तालुक्याचे अधिकारी देवेंद्र हिरापुरे व जिवन कौशल्य शिक्षक लेखाराम हूलके, विषयात्मक शिक्षक सुधाकर कुकुळकर, समुदाय समन्वयक रिना बांगरे, सरपंच, गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक वर्ग व मॅजिक बस सत्रात सहभागी विद्यार्थी यांच्या परिश्रमाने हा जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !