उप-जिल्हा रुग्णालय मुल येथे सिजर व सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात करिता स्थायी स्त्री रोग तज्ञ नेमण्यात यावे.


उप-जिल्हा रुग्णालय मुल येथे  सिजर व सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात करिता स्थायी स्त्री रोग तज्ञ नेमण्यात यावे.


◆ अशी मागणी मा.तहसीलदार साहेब मुल यांच्या मार्फत मा.जिल्हा शल्य चिकित्सक साहेब चंद्रपूर यांच्याकडे निखिल वाढई, प्रणित पाल,आकाश येसनकर रोहित शेंडे व युवा वर्गाकडून करण्यात आली.


एस.के.24 तास


मुल : ( नितेश मँकलवार ) उपजिल्हा रुग्णालय मुल येथे  स्थायी स्वरूपात स्त्री रोग तज्ञ नसल्याने ग्रामीण क्षेत्रातील व मुल शहरातील गोरगरीब महिलांना मुल  उपजिल्हा रुग्णालय असून सुद्धा सिजर किंवा सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात करिता सोय नाही. याकरिता  चंद्रपूरला जिल्हा रुग्णालयात संदर्भित ( रेफर ) करावे लागते यामुळे मुल तालुक्यातील  महिलांना 45 KM दूर जाऊन आपला उपचार करावा लागतो. त्यामुळे गर्भवती महिलांना आर्थिक व मानसिक त्रास सोसावा  लागत आहे.


स्थायी स्वरूपात उपजिल्हा रुग्णालय मध्ये स्त्री  रोग तज्ञ उपलब्ध झाल्यास सिजर व सिरक्षित आणि कायदेशीर गर्भपात  ची सेवा तालुक्यातील  स्त्री रुग्णांना  महिलांना मिळेल आणि आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागणार नाही तरी लवकरात लवकर याकडे लक्ष वेधून महोदय उपजिल्हा रुग्णालय मुल येथे स्थायी स्त्री रोग तज्ञ सिजर व गर्भपात करिता नेमण्यात यावे अशी मागणी ,


मा.तहसीलदार साहेब यांच्यामार्फत मा.जिल्हा शल्य चिकित्सक साहेब चंद्रपूर यांच्याकडे निवेदन मार्फत मागणी करण्यात आली.ही मागणी पूर्ण झाली नाही तर, युवा वर्ग  आक्रमक पवित्रा घेणार व काही अनुचित प्रकार घडल्यास याला संबंधित प्रशासन जबाबदार राहणार असा इशारा देखील निवेदन मार्फत देण्यात आला.निवेदन देतांना ,निखिल वाढई,प्रणित पाल,आकाश येसनकर, रोहित शेंडे, निहाल गेडाम,उपस्थित होते.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !