कृषी संजीवनी मोहिमेला सुरुवात.


               कृषी संजीवनी मोहिमेला सुरुवात.


एस.के.24 तास


सावली : ( सुरेश कन्नमवार ) सावली तालुका कृषि विभागामार्फत प्रत्येक गावात लोकप्रति‍निधी/पदाधिकारी, कृषि मित्र,प्रगतशिल शेतकरी, रिसोर्स बँक  शेतकरी यांचे  सहकार्याने व त्यांचे उपस्थितीत कृषि संजिवनी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा  शेतकरी बंधुनी लाभ घ्यावा,असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी श्री एस.आर.ढवळे यांनी मौजा मोखाळा येथे कृषि संजीवनी मोहिमेचा शुभारंभ करताना केले . यावेळी  कार्यक्रमाचे अध्यक्ष  मौजा- मोखाळा ग्रामपंचायतीचे  सरपंच श्री सुरेश गोडसेलवार उपस्थित होते.

         कृषि विभागामार्फत दरवर्षी खरीप हंगामाच्या पूर्व संध्येला राज्यभर शेतकरी बंधूसाठी विविध सप्ताहाचे आयोजन केले जाते, यावर्षी दिनांक 21 जून 2021 ते दिनांक 01/07/201 पर्यंत कृषि संजीवनी मोहीम यशस्वी करण्याचे शासन धोरण आहे. त्यामुळे सदर मोहीम तालुक्यातील तळागाळातील शेतक-यांपर्यत पोहचविण्याकरीता कृषी विभाग कसोशीने प्रयत्न करीत आहे.सदर मोहीमेच्या माध्यमातून शेतक-यांना प्रशिक्षण, चर्चासत्र, सभा, प्रात्यक्षिक आधारित शिवार फेरी इ. माध्यमाचा वापर करण्यात येणार आहे. पीक लागवड पध्दतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जमिनीच्या आरोग्य तपासणीनुसार पीकास संतुलित खत मात्रा देणे. 10 % रासायनिक खताचा कमी वापर करुन  रासायनिक खतास  पर्यायी वनस्पतीजन्य  जैवीक घटकाचा खत व कीटकनाशक म्हणून वापर करण्यावर भर देणे. 100% बीजप्रकिया करुन पेरणी करणे. यांत्रिक पेरणी, पटटा पध्दत,रुंद वरंभा सरी पध्दत, टोकन व श्री पध्दत, कृषीक ॲप या आधुनीक तंत्राचा वापर करणे.इ. प्रमुख घटकाचा कोव्हीड-19 ची खबरदारी घेत  प्रचार व प्रसार करण्यावर  मोहीमेत भर  राहाणार आहे. याचा लाभ  शेतकरी बंधुनी करुन घ्यावा. 

          कार्यक्रमास मंडळ कृषि अधिकारी श्री आण्णाराव वाघमारे, कृषि पर्यवेक्ष्क श्री दिनेश पानसे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. सदर कार्यक्रमास बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषि सहाय्यक श्री गौतम मेश्राम, श्री रोशन डोळस यांनी सहकार्य केले.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन /प्रास्तावीक कृषि सहाय्यक श्री काळे यांनी केले. तर आभार श्री नरेश कुंभारे यांनी मानले.


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !