कोरोना हद्दपार करण्यासाठी ऍन्टीजन टेस्ट.
एस.के.24 तास
सावली : ( कमलेश वानखेडे ) संपूर्ण पाथरी गाव तथा परिसरातील गाव कोरोना मुक्त करण्यासाठी सातत्याने ग्रामपंचायत पाथरी पोलीस स्टेशन पाथरी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र पाथरी धडपड करीत आहेत.आज सकाळपासून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर बँकेच्या कामासाठी लोकांची वर्दळ सुरू असतांना गावातील उपसरपंच मा.प्रफुल भाऊ तुम्मे यांच्या निदर्शनास आले.त्यांनी त्वरित प्राथमिक आरोग्य अधिकारी यांना सम्पर्क साधून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर अँटिजेंन टेस्ट ची सोय उपलब्ध करून दिली.बँकेत आलेल्या सर्व नागरिकांनी सुध्दा कोरोना काळात आपले आरोग्य चांगले आसवे करिता अँटिजेंन टेस्ट साठी पूर्ण सहयोग दिला.या करिता ग्राम पंचायत पाथरी पोलीस स्टेशन आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी यांनी सुध्दा सहकार्य केले.