चौकीदाराचा मृतदेह आढळला शेतातमृ तदेह अर्धनग्न अवस्थेत.
◆ मानेगाव शेतशिवारातील घटना.
एस.के.24 तास
भंडारा :(मुकेश मेश्राम) लाखनी तालुक्यातील मानेगाव शेतशिवारात असलेल्या फार्महाऊस मध्ये कामावर असलेल्या चौकीदाराचा मृतदेह आढळल्याची घटना सोमवार दिनांक 21 जून रोजी सकाळी ११:३० वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. विठोबा इस्तारी मेश्राम (वय ६०)राहणार पेंढरी असे मृतचौकीदाराची नाव आहे.
विठोबा इस्तारी मेश्राम हे लाँकडाऊन काळामध्ये काळामध्ये हाताला काम नसल्यामुळे महिनाभरापासून मानेगाव शिवारातील आलेसुर रस्त्यावरील असलेल्या फामाऊस मध्ये चौकीदार म्हणून कामावर होते. त्यांचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळल्याने घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक मनोज वाडीवे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप कुमार घरडे यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळावर पोहोचले. मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळल्याने पोलीस संशय बळावला. पोलिसांनी चौकशी केली व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय करण्यात आले.मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला .शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर के मृत्यूचे कारण काय होते ते कळेल.
विजय पोहरकर यांच्या फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी तक्रार दाखल केली. घटनेचा अधिक तपास हवालदार सुभाष राठोड व प्रमोद टेकाम करीत आहेत.