सोलार इंडस्ट्रीज लिमिटेड वरुर रोड राजुरा परत एकदा वादाच्या भोवऱ्यात. ◆ तीन कामगारांना कुठलीही पूर्वसूचना न देता केले कामावरून कमी. ◆ सुरज ठाकरे यांची सहाय्यक कामगार आयुक्त यांना तक्रार.

सोलार इंडस्ट्रीज लिमिटेड वरुर रोड  राजुरा परत एकदा वादाच्या भोवऱ्यात.


◆ तीन कामगारांना कुठलीही पूर्वसूचना न देता केले कामावरून कमी.


◆ सुरज ठाकरे यांची सहाय्यक कामगार आयुक्त यांना तक्रार.


एस.के.24 तास


चंद्रपूर : वरुर रोड येथे सोलार कंपनीही वेकोलि ला विस्फोटक पुरवण्याचे काम करते. अनेक वर्षापासून सदर कंपनीही या ठिकाणी कार्यरत आहे २०२० मध्ये ही कंपनी चर्चेत आली. कारण या कंपनीने तालुक्यातील स्थानिक तरुणांना रोजगार न देता परप्रांतियांचा भरणा या कंपनीमध्ये विविध कामांकरिता केला होता. या विरोधामध्ये त्यावेळी संपूर्ण वरूर गाव एकत्र येऊन सुरज ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन केले. त्या आंदोलनाला अखेर मागण्या कायदेशीर असल्यामुळे कंपनीला नमावे लागले व स्थानिकांना कामावर घ्यावे लागले. असे असताना देखील कायद्याच्या दबावामुळे वरुर रोड येथील स्थानिक मुलांना कामावर तर घेतले. परंतु त्या ठिकाणी कुठल्याही कारणाने त्यांची पिळवणूक करणे काही कंपनीने अजूनही सोडलेले नाही. यातच कंपनीची अरेरावी आता खपवून घेणार नाही मुलं बेरोजगार राहिली तरी चालतील अशी भूमिका वरुर वासियानी  घेतली लॉक डाउन लागण्याच्या आधी कंपनीने वरुर रोड ग्रामपंचायतीकडे आणखीन एक युनिट सुरू करण्या करता ना हरकत प्रमाणपत्र हवे असल्याबाबत अर्ज केला .त्यावेळी सुरज ठाकरे यांनी गावकऱ्यांच्या आग्रहास्तव तेथे येऊन ना हरकत प्रमाणपत्र कंपनीला मिळू दिले नाही. त्यामुळे कंपनी आपले दुसरे युनिट त्याठिकाणी  सुरू करू शकली नाही व लॉकडाऊन नंतर ग्रामसभा अजून पर्यंत घेण्यात आलेली नाही हा प्रश्न कंपनीचा ग्रामपंचायत कडे प्रलंबितच आहे यातच आता कंपनीने जाणीवपूर्वक आपल्या अधिकार व हक्कासाठी लढणाऱ्या१) मुकेश धोबे२) प्रदीप बोरकुटे व ३)ऋषी चौधरी या कामगारांना काहीही कारण नसताना तथा कायदेशीर स्वरूपाने कामावरून काढण्याकरता  सूचना पत्र देणे आवश्यक आहे.

व कामगाराला आपली बाजू मांडू देण्याचा अधिकार कायद्याने दिला असताना. देखील परत  कामगार कायद्यांची अवहेलना करत या तीनही तरुणांना बेकायदेशीररित्या कामावरून काढून टाकले आहे. आता  याची तक्रार सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे सुरज ठाकरे यांनी केली आहे व या कामगारांना परत पुन्हा कामावर घेण्यात आले नाही तर आंदोलनाचा इशारा देखील सुरज ठाकरे यांनी सहाय्यक कामगार आयुक्त व कंपनीला दिला आहे. आपल्या भागातील कंपन्या या सातत्याने कामगार कायद्यांची पायमल्ली करीत असून उदासीनता दाखवतात व कामगार कायद्यांना हलक्याने घेत आहेत व कामगारांचे व स्थानिकांचे शोषण सुरू आहे. स्थानिक प्रशासन व स्थानिक नेते याबाबत गंभीर नाहीत .आणि म्हणून स्थानिक तरुणांना रोजगार मिळत नाही असा आरोप सुरज ठाकरे यांनी आज दिलेल्या पत्रकामध्ये केला आहे. आता समोर प्रशासन व कंपनी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !