युवा संकल्प संस्थेच्या माध्यमातून जैरामपुर येथील युवकांना खेळण्यासाठी व्हॉलीबाल व नेट च वितरण.
एस.के.24 तास
चामोर्शी : ( प्रशांत चुधरी ) युवा संकल्प संस्था शाखा आष्टी च्या माध्यमातून.जैरामपुर येथील युवकांना व्हॉलीबाल खेळण्यासाठी.बाल व नेट देण्यात आली. सद्या कोविडच्या काळात मुले मैदानी खेळ सोडून मोबाईल च्या आँनलाईन खेळात व्यस्त आहे. मैदानी खेळा कडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे मोबाईल खेळ खेळल्यामुळे मुलांची मनस्थिती बदलते.त्यामुळे युवकांनी जास्तीत जास्त मैदानी खेळावर लक्ष केंद्रीत करावे असे आवाहन युवा संकल्प शाखा आष्टी प्रमुख विशाल बंडावार यांनी सांगितले या वेळी युवा संकल्प शाखा आष्टी प्रमुख मा.विशालभाऊ बंडावार यांच्या हस्ते व्हॉलीबाल व नेट चे वितरण करण्यात आले. या वेळी खेळाडू नथु गेडाम, नितेश बोमकंटीवार,हर्षल धानोरकर,एकनाथ चांदेकार,अंकित पाल,अजित गौरकार,यश पावडे, अक्षय बोमकंटीवार,चेतन बोरकुटे,दिशांत बोमकंटीवार,देवाशिष येमलकुलतीवार,अमित शेंन्डे उपस्थित होते.