ओबीसींची जातनिहाय जनगणना करा,आरक्षण पुर्ववत करा,अन्यथा सत्ता सोडा.
- केंद्र सरकारला ओबीसींनी ठणकावले.
- ओबीसी समाज एकवटला.
- राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने जिल्हाभर निदर्शने संपन्न.
एस.के.24 तास
सावली : ( सुरेश कन्नमवार ) ओबीसींची जातनिहाय जनगणना करा,ओबीसींचे राजकीय व इतर क्षेत्रातील व जिल्ह्यातील आरक्षण पुर्ववत करा,अन्यथा सत्ता सोडा, ओबीसींची जातनिहाय जनगणना जो करेल ओबीसी समाज त्याच्या सोबत,ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवा, नवे पर्व ओबीसी सर्व असा एल्गार करीत ओबीसी समाजाने कार्यालयासमोर आज (दि.२४) ला निदर्शने केली.
राष्ट्रीय ओबीसी महासंघा तर्फे ओबीसी समाज एकवटला.
ओबीसी समाजाची २०२१ मधे होऊ घातलेली जातनिहाय जनगणना केंद्र सरकार करत नसेल तर महाराष्ट्र शासनाने राज्यात ओबीसींची जातनिहाय जनगणना करुन ओबीसी समाजास न्याय मिळवून द्यावा, दिनांक 4 मार्च 2021 चा सुप्रीम कोर्टाच्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने पुर्ववत करण्याकरीता समर्पित आयोगाची नियुक्ती करुन इम्पेरीकल डाटा गोळा करुन संकलित माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर करुन ओबीसींचे राजकीय आरक्षण लवकरात लवकर लागु करावे, २४३ डी व २४३ टी या घटनात्मक कलमान्वये घटनादुरुस्ती करुन ओबीसींचे राजकीय आरक्षण २७% निश्चीत करा, मराठा समाजाचा ओबीसी संवर्गात समावेश करण्यात येवू नये, क्रिमीलेयरची मर्यादा मागील चार वर्षांपासून न वाढल्याने ती वाढवा,ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मध्ये आरक्षण दया, चंद्रपूर, गडचिरोली,यवतमाळ,नंदुरबार,धुळे,ठाणे, नाशिक,रायगड व पालघर अशा आठ जिल्ह्यातील कमी झालेले आरक्षण पुर्ववत करा,ऑल इंडिया मेडिकल कोटा मध्ये ओबीसींच्या कमी झालेल्या जागा पुर्ववत करा, ओबीसींचा बॅकलॉक त्वरित भरा,आधी जातनिहाय जनगणना करा व मगच रोहिणी आयोग लागु करा,व राज्यसरकारने मेगा नोकर भरती त्वरीत करावी,राज्य शासनाने एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षा त्वरीत घ्याव्या,आदी अनेक मागण्यांवर आंदोलन करुन केंद्र व राज्य सरकारांना निवेदन देण्यात आले.
यावेळी आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे
तालुका अध्यक्ष कविंद्र रोहणकर,सचिव भाऊराव कोठारे, अविनाश पाल,प्रकाश पा.गड्डमवार,विजय कोरेवार, उषाताई भोयर,सतिशभाऊ बोमावार, संजोग आभारे, अरूण पाल,विनोद धोटे,अंकुश भोपये,दिवाकर काचीनावर,आशिष मंनबत्तूनवार,दिलीप पा.ठीकरे,पुनम झाडे,जिवन भोयर,के.व्ही,एनगंटीवार,बी.बी.लाटकर, किशोर खेडेकर,सदाशिव सहारे,सुनिल भोयर,भुवन सहारे,तुळसीदास भुरसे,वासुदेव शेरकी,अंकुश भांडेकर,गिरीश चिमुरकार,दिपक जवादे,अर्जुन भोयर,किशोर घोटेकर,दिवाकर गेडाम,किनेकर गुरुजी,नागोराव कोठारे,किशोर कोराडे,श्रीकृष्ण भुरसे,सुनिल जजम्पलवार,मिथुन बाबनवाडे,श्रीधर आभारे,सुनिल पाल,कुनघाडकर गुरुजी,विशाल करंडे तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व शाखाचे पदाधिकारी, ओबीसी च्या सर्व संघटना,ओबीसीत मोडणाऱ्या सर्व जात संघटना सहभागी होत्या.