मॅजिक बस तर्फे गडचिरोली तालुक्यातील विविध गावात आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा व उन्हाळी शिबीर उपक्रमाला आरंभ.
एस.के.24 तास
गडचिरोली : मॅजिक बस इंडिया फाउंडेशन गडचिरोली,टाटा प्रकल्प 'सर्वांगीण शिक्षण' या कार्यक्रमाअंतर्गत तालुक्यातील बाम्हणी,आंबेशिवनी, जेप्रा,खरपुंडी व आंबेटोला या गावात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करून उन्हाळी शिबीर उपक्रम विविध ऍक्टिव्हिटी च्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे. मॅजिक बस इंडिया फाउंडेशन ही संस्था गडचिरोली तालुक्यात १२०० व चामोर्शी तालुक्यात ३०० मुलांसाठी" तर नेस्ले हेल्दी किड्स कार्यक्रमात २००० मुलांसाठी खेळाच्या माध्यमातून विकास " हा कार्यक्रम राबवित आहे. या कार्यक्रमांतर्गत जीवन कौशल्य(संवाद कौशल्य, गट कार्य, समस्या सोडविणे, शिकण्यातुन शिकणे व स्व व्यवस्थापन) व विषयात्मक शिक्षण(सी एल सी) द्वारे विज्ञान, गणित, इंग्लिश आदी कार्यक्षेत्रावर काम करीत आहे . सदर कार्यक्रम हा मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने फायदेशीर असून १२ ते १६ वयोगटातील मुलामुलींना वरील विषयावर मार्गदर्शन करण्यात येते. मॅजिक बस इंडिया फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून गडचिरोली जिल्यातील गडचिरोली आणि चामोर्शी या दोन तालुक्यातील गावांमध्ये " खेळाच्या माध्यमातून विकास " हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.तर चामोर्शी येथे ४०० कुटुंब व ८०० युवकासोबत त्यांचे कोरोनामुळे गेलेले उदरनिर्वाह व्यवस्थित करण्याकरिता काम करीत आहे.
या कार्यक्रमांतर्गत मॅजिक बस सत्रात भाग घेणाऱ्या मुलांकडून योगा दिवसाचे महत्व व आपली जीवन कौशल्य अमलात आणून आपल्या जीवनात ते कसे वापरतील हे ऍक्टिव्हिटीद्वारे घेऊन,मुलांची शिक्षणाबद्दल आवड निर्माण व्हावी,शाळेत जाण्याची नियमितता टिकून राहावी आणि अगोदर झालेल्या सत्रातील जीवन कौशल्य मुले आचरणात आणावी या करिता या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
हा कार्यक्रम पुढील आठवड्यात विविध गावात घेण्यात येनार असून, हा कार्यक्रम जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा.प्रशांत लोखंडे सर यांच्या मार्गदर्शनातून घेण्यात येत आहे.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यक्रम व्यवस्थापक गडचिरोली मा.देवेंद्र हिरापूरे व जिवन कौशल्य शिक्षक लेखाराम हुलके,देवाजी बावणे व विषय शिक्षक सुधाकर कुकुडकर, बारुबाई शेडमाके व सीसी दिवाकर सोनबावणे व रीना बांगरे यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम व कोरोनाचे नियम पाडून घेण्यात येत आहे .