स्थानिक गुन्हे शाखेने ठोकले दुचाकी चोरट्यास बेड्या.


 स्थानिक गुन्हे शाखेने ठोकले दुचाकी  चोरट्यास बेड्या.


           सुरेश कन्नमवार                                      मुख्य संपादक : -एस.के.24 तास


चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका दुचाकी चोरट्यास ठोकल्या बेड्या ठोकल्या.त्याच्याकडून  पाच दुचाकी सह 1 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त केले.

या कारवाई मुळे जिल्ह्यातील दुचाकी चोरीचे 4 गुन्हे उघडकीस आले आहेत. ऋशेष चंद्रभान आत्राम ( वय 22 रा. विसापूर ) असे अटकेतील दुचाकी चोरट्याचे नाव आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात भिवापूर वार्डातील जुना बेनार चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे,संजय आतकुलवार,नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार,कुंदनसिंग बावरी,या कर्मचाऱ्यांचे पथक रामनगर आणि शहर पोलीस ठाणे हद्दीत मोटार सायकल चोरट्यांच्या शोधमोहीम साठी गस्तीवर होते.

चंद्रपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील भिवापूर वार्डातील जुना बेनार चौक परिसरात विसापूर येथील एक युवक MH 34 AR 2748 क्रमांकाची दुचाकी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली.

त्यानंतर पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना या बाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळावर जाऊन दुचाकीसह युवकांना ताब्यात घेतले. वाहनांच्या कागदपत्रं बाबत विचारणा केली असता त्याने कागदपत्रे नसल्याचे सांगत उडवाउडवीचे उत्तर दिल्ली.

ऋशेष चंद्रभान आत्राम ( वय 22 रा. विसापूर ) असे त्यांनी आपले नाव सांगितले. 

पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन विचारणा केली असता.त्याने दोन दिवसापूर्वी डी.आर.सी.हेल्थ क्लब समोरून ही दुचाकी चोरी असून ती विकण्यासाठी आल्याने आल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून पुन्हा कसून चौकशी केली असता.

सावली येथून 2 भद्रावती आणि रामनगर पोलिस ठाणे हद्दीतून प्रत्येकी 1 दुचाकी चोरल्याची कबुली दिली.पोलिसांनी त्याच्या कडून

 MH 34 AR 2748 - MH 34 BX 0622           MH 34 BU 9130 - MH 34 Z 0023 

आणि एक बिना क्रमांकाचे वाहन जप्त केले.ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे,अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे,संजय आतकुलवार, नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार,कुंदनसिंग बावरी,यांच्या पथकाने कारवाई केली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !