जागतिक पर्यावरण दिन,कोरोनाने दिल ' एक झाड एक उद्देश ' विशाल दिवाकर बंडावार यांच्या लेखणीतून...


 जागतिक पर्यावरण दिन,कोरोनाने  दिल ' एक झाड एक उद्देश '


  विशाल दिवाकर बंडावार यांच्या लेखणीतून...

 

संकलन : -  प्रशांत चुदरी                             एस.के.24 तास ता.प्र,चामोर्शी



 कोरोना हा निसर्गाने आपल्याला दिलेला धडा आहे. म्हणूनच आपण सगडे आपल्या जगण्याचा नव्याने विचार करू लागलो आहोत. 'एक झाड एक उद्देश'  आज जागतिक पर्यावरण दिन खूप काही अनुभव आपल्या सोबत घेऊन आला आहे. सद्या अवघे अनेक देश कोरोनाशी लडा झुंजत आहेत. नुकताच महाराष्ट्र किणार पट्टिवर आपण चक्रिवादळ अनुभवला किनाऱ्यावर सोसाट्यांचे  वारे वाहणारे इशारे येत आहेत. इकडे तिकडे प्रदेशात टोळधाडीचे संकट आले...हवामान बदलाचा एवढा सारा रुद्रावतार दाखवत आज  पर्यावरण दिन उगवला आहे.



      कोरोनामुळे लाँकडाऊन सुरु झाला आणि आपण आपल्या धक्काधकीच्या जीवनात रमलो आपण आपल्या अवतीभवती सजगतेने पाहू लागलो. एकिकडे शहरातील असणाऱ्या लोकांचे निसर्गाकडे फारसे लक्ष नाही. पण मोबाईल च्या अर्लॉम काँल्सनी जागे होणारे आपण पहाटेच्या पक्ष्यांच्या आवाजांनी जागे होऊ लागलो.


आपल्या सोबत काही झाडे, पक्षीही आपल्या सान्निध्यात राहतात. हे आपन  अगदी ठळकपणे  जाणवतो लाँकडाऊन दिवस जसजसे वाढत गेले तसतशी हवा स्वच्छ होऊ लागली. वाहनांचे प्रदूषण, धुरके यामुळे श्वास कोंडलेल्या शहरामध्ये खूप दुरपर्यत चे नजारे दिसू लागले.

औद्योगिकरण आणि डिजिटल क्रांतीमध्ये गढूळ गेलेले आपण हे सगळे पाहून स्तिमित झालो.आणि निसर्गप्रेमींना हा लाँकडाऊन हवाहवासा वाटू लागला.जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाच्या या दिवसांत जग असेसुध्या असू शकते याची कल्पना सुध्दा आपण केली नाही. कोरोनाने जिथे पहिल्यादा थैमान घातले त्या चीनमधल्या वुहानमध्ये हा निसर्ग कसा श्वास घेत आहे. याचीही एक हेलटाऊन टाकणारा एक विडीओ आला होता.



हे सगळे पाहून आपण भानावर आलो आणि मनात अशा स्वच्छ सुंदर जगाची उमेद जागवली गेली. काही पर्यावरणवादी कार्य करते तर दरवर्षी असा पर्यावरणासाठी म्हणून किही दिवस लाँकडाऊन करा. अशी मागणी करू लागले. थोडे दिवस हे संगळ छान चालले होत पण पुन्हा पुन्हा लाँकडाऊन ची भयानकता जाणवू लागली. उद्योगधंदे बंद पडले,रोजगार गेले, बेरोजगारी वाढत गेली  भविष्याबद्दलची न संपणारी अनिश्चितता जाणवू लागली आणि मग हा स्वच्छ हवेचा असह्य होऊ लागला....!!



लेखक :  विशाल दिवाकर बंडावार                       प्रमुख युवा संकल्प संस्था,शाखा आष्टी                      मो.न : -  7038269125

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !