१६ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या.


 १६ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या.

 

एस.के.24 तास


राजुरा : तालुक्यातील टेंबुरवाही गावात दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास16 वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. मृतक तरुणीचे नाव दिपाली बापूजी मरापे वय 16 वर्ष टेंबुरवाही असे आहे. दिपालीने उद्धव लचमा कुडसंगे (आजोबा) याचे राहते घरी दोरीला गड़फास लाऊन आत्महत्या केली.


मृतक मुलीचे सर्व परिवार शेतात कामा निमित्त गेले होते. गावकऱ्यांना प्रेत दिसताच त्यांनी तिच्या परिवाराला कळविले असता परिवार घरी पोहोचताच त्यांना धक्काच बसला. गावातील पोलीस पाटीलास सांगितले आणि पोलीस पाटलांनी विरुर पोलीस स्टेशन ला माहिती दिली असता लगेच विरुर पुलिस स्टेशन पोलीस निरीक्षक श्रीकृष्णा तिवारी यांच्या मार्गदर्शनात मौका पंचनाम्या करिता पो. हवा वागदरकर, मपोशी सौजण्या, पोशी मडावी, होमगार्ड धनपालसिंग वाधावन यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. शव ताब्यात घेऊन शवविच्छेदना करीता उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे   पाठविण्यात आले. 


     वृत्त लिहेपर्यंत आत्महतेचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास विरूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्रीकृष्णा तिवारी यांचा मार्गदर्शनात विरुर पोलीस करीत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !