चिमुर कान्पा रोडवर दुचाकी चा आमोरा - समोर भीषण अपघात. ◆ दोघांचा मृत्यु तर एक जण गंभीर जखमी.


 चिमुर कान्पा रोडवर दुचाकी चा आमोरा - समोर भीषण अपघात.


◆ दोघांचा मृत्यु तर एक जण गंभीर जखमी.


एस.के.24 तास


चिमूर : दिनांक.27/06/2021 ला 12:00 वाजता च्या सुमारास चिमुर शहरातिल आर.टी.एम कॉलेज समोर दुचाकी - दुचाकीची समोरा - समोर जोरदार टक्कर होऊन दोघांचा जागेवरच मृत्यु झाला तर एक गंभीर जखमी आहे.चिमुर वरुन कांपा कडे अजय महादेव राऊत व सनी छत्तीसगड हे एका दुचाकीवर कांपा च्या दिशेने चालले होते आणि अतुल चौधरी नाचणभट्टी हे आपल्या दुचाकीने कामानिमीत्य चिमुर ला येत होते या दोन्हा दुचाकी मध्ये समोरा - समोर जोरदार टक्कर झाली या घटनेत दोन व्यक्ती चा जागीच मृत्यू झाला पडले असून त्यात इंदिरा नगर चिमूर येथील अजय महादेव राऊत व सनी छत्तीसगड यांचा समावेश असून अतुल चौधरी नाचणभट्टी हा इसम जखमी असून त्यांचेवर उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचार सुरु आहे पुढील तपास चिमुर पोलीस करीत आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !