सिंदेवाही तालुका पुरोगामी पत्रकार संघाची नविन कार्यकारिणी जाहीर.
एस.के.24 तास
सिंदेवाही : तालुका पुरोगामी पत्रकार संघाची कार्यकारिणी आज पुर्ण नियमानुसार व शासनमान्य पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय विजय सूर्यवंशी सर तसेच संघाचे पुर्व विदर्भ अध्यक्ष माननीय नरेंद्र सोनाकर साहेब यांच्या सुचनेनुसार नव्याने कार्यकारिणी तयार करण्यात आली.
सिंदेवाही तालुका पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष - मिथुन मेश्राम यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष - कुणाल उंदीरवाडे यांची बहुमताने बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच तालुक्याच्या सचिव पदी सुनील गेडाम यांची निवड करण्यात आली.आणि ,सहसचिव - जितेंद्र नागदेवते व कार्याध्यक्ष - आक्रोश खोब्रागडे, व कोषाध्यक्ष - अमन कुरेशी तसेच संघटक - मुकेश शेंडे, प्रसिद्धीप्रमुख - वीरेंद्र मेश्राम,संपर्कप्रमुख - अमोल निनावे सदस्य - अंबादास दूधे अशी कार्यकारिणी बनविण्यात आली.