छत्रपती शाहू महाराज जयंतीदिनी भाजपच्या वतीने राज्य सरकार विरोधात राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन.
एस.के.24 तास
भंडारा : ( मुकेश मेश्राम) छत्रपती शाहू महाराज जयंतीदिनी भाजपच्यावतीने राज्य सरकारविरोधात भंडारा येथील त्रिमूर्ती चौक येथे राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी आमदार डॉ परिणय फुके म्हणाले, ४ मार्च २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार राज्यात २७ टक्के ओबीसी आरक्षण संपविण्यात आले. एकीकडे ओबीसी च्या नावाखाली मते घ्यायची, मोठे मोठे मोर्चे काढायचे, आंदोलने करायची आणि लोकांना सांगायचे की ओबीसी आरक्षण कमी होऊ देणार नाही आणि दुसरीकडे मात्र ओबीसी समाजाच्या विरोधात षडयंत्र रचून ओबीसी आरक्षण राज्यात संपवन्याचा खेळ या महाभकास आघाडी सरकारने केलेले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या दुर्लक्षित धोरणामुळे ओबीसी, मराठा व मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील हक्काचे आरक्षण हे सरकार वाचवू शकले नाही.
पुढे म्हणाले की, १५ महिने राज्य मागासवर्ग आयोग तयारच केला नाही. केवळ न्यायालयात तारखा मागत राहिले. त्यामुळे ५० टक्क्याच्या आतले सुद्धा ओबीसी आरक्षण रद्द होण्याचे पाप हे केवळ आणि केवळ महाविकास आघाडी सरकारचे आहे. या आरक्षणासाठी जनगणनेची नाही तर एम्पिरीकल डेटाची गरज होती. न्यायालयाने दि.१३/१२/२०१९ ला एम्पिरीकल डाटा जमा करायला सांगितला होता. ते ही या सरकारने जमा केलेली नाही.
त्यामुळे ५०% आतील आरक्षण सुद्धा रद्द करण्यात आले. त्यामुळे जो पर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तो पर्यंत शांत बसणार नाही अशा इशारा डॉ फुके यांनी आंदोलन वेळी दिला.
याप्रसंगी प्रदेश कार्यकारी सदस्य डॉ उल्हास फडके, माजी जिल्ह्याध्यक्ष श्री प्रदीपजी पडोळे, जिल्हा महामंत्री प्रा.डॉ हेमंतजी देशमुख,महामंत्री जिल्हा श्री चैत्युजी उमाळकर, जिल्हा महामंत्री श्री प्रशांत खोब्रागडे, शहराध्यक्ष श्री संजय कुंभलकर, ग्रामीण अध्यक्ष श्री विनोदजी बांते, जिल्हा उपाध्यक्ष श्री मुन्ना फुंडे, माजी जि.प.अध्यक्ष सौ वंदना ताई वंजारी, जिल्हा सचिव श्री भगवंत चांदेवार, श्री निशिकांत इलमे, श्री संतोष त्रिवेदी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री तिलकजी वैद्य, श्री विकास मदनकर, श्री रब्बी चड्डा, जिल्हा सचिव श्री आशु गोंडाने, श्री मंगेश वंजारी, श्री नितिन कडवं, श्री अरविंद भालाधरे, श्री निळकंठ कायते, श्री रामराव कारेमोरे, श्री महेंद्र निंबार्ते, जिल्हा महामंत्री ओबीसी मोर्चा श्री दिनेश निमकर, श्री हितेंद्र पौणिकर, महिला मोर्चा महामंत्री सौ. मंजिरी पनवेलकर, महामंत्री सौ कल्याणी भुरे, महामंत्री डॉ विजया नंदूरकर, सौ.चंद्रकला भोपे, सौ. माला बघमारे, सौ.झाशी गभने, सौ. वर्षा साकुरे, सौ. साधना त्रिवेदी, सौ.वनिता कुथे, सौ.गीता सिडाम, सौ.रोशनी पडोळे, सौ.रोहिणी आस्वले, सौ.स्नेहा श्रावनकर, श्री बबलू आतिलकर, श्री उमेश मोहतुरे, श्री आशिष हटवार, श्री राजेश वाघमारे, श्री गुणवंता पुडके, श्री मनोहर खरोले श्री मनोज बोरकर, श्री कैलास तांडेकर, श्री मिलिंद मदनकर, श्री अनिल भुरे, श्री चंद्रप्रकाश दुरुगकर, डॉ दिलीप फटींग, श्री राजेश वाघमारे, श्री विष्णूदास हटवार, डॉ राजेश नंदूरकर, श्री भुपेश तलमले, श्री रोशन काटेखाये,श्री अमित बिसने, श्री लोकेश गभने, श्री शुभम चौधरी, श्री संदीप भांडारकर तसेच मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ता आंदोलनात सहभागी होते.