युवा संकल्प संस्थेतर्फे योग दिन साजरा.
नियमित योगा करून आरोग्य सांभाळावे.यु.सं.सं. शा.आष्टी प्रमुख यांचे आवाहन.
एस.के.24 तास
गडचिरोली : आजच्या आधुनिक धावपळीच्या जीवनात योगाला अन्न साधारण महत्व प्राप्त झाले आहे. निरोगी व उत्तम आरोग्यासाठी व्यायामाची सगळ्यांना नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे नियमित योगाकरुन आरोग्य सांभाळावे असे यु.सं.सं.शा.आष्टी प्रमुख विशाल बंडावार यांनी केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आकाश विद्यालयाच्या मैदानात योगा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी युवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या वेळी यु.सं.सं.प्रमुख विशाल बंडावार यांनी योगा कार्यक्रमात सहभागी होऊन योग निमित्त स्वतः १ तास योगा करून उत्तम आरोग्यासाठी नियमित योगा करण्याचा युवकांना संदेश दिला.या प्रसंगी हर्षल धानोकार,नथु गेडाम,यश पावडे,देवाशिष येमलकुलतीवार, शुभम पोलशेट्टीवार,अंकित पाल,अमित शेंडे,मोहन गौरकार,एकनाथ चांदेकार,मनिष खबनकार,योगा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहन धानोकार,चेतन बोरकुटे,यांनी सहकार्य केले.