युवा संकल्प संस्था यांच्या वतीने ऑनलाईन सामान्य ज्ञान परीक्षा वृक्षारोपण.
प्रशांत चुधरी एस.के.24 तास तालुका प्रतिनिधी,चामोर्शी मो.नं : - ७४९९७१६१०७.
चामोर्शी : युवा संकल्प संस्था विदर्भ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त. online सामान्य ज्ञान परिक्षा पार पडली. कोरोना या महामारीवर प्रतिबंधक उपाय म्हणून सुरू असलेल्या लाँकडाऊन मुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या ज्या विद्यार्थीचे खूप आर्थिक नुकसान झाले अश्या गरीब व होतकरू ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परिक्षेची गोडी लागावी. त्यांच्या ज्ञानात भर पढावा म्हणून.आँनलाईन सामान्य ज्ञान परिक्षा हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.यामध्ये ९५६ विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये सहभाग नोंदवला होता त्या पैकी ८३२ विद्यार्थ्यांनी ही आँनलाईन परिक्षा दिली.
ग्रामपंचायत मुधोली तुकूम अंतर्गत येणाऱ्या बाम्हणी (देव) येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. दरवर्षी मोठ्या प्रमाणात अवैध व्रूक्षतोड केली जात असल्याने. पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व्रूक्ष लागडीसह वृक्ष संवर्धन करणे गरजेचे आहे असा संदेश विशाल बंडावार प्रमुख युवा संकल्प संस्था - शाखा आष्टी यांनी वृक्षारोपण माध्यमातून नागरिकांना दिला.
आणि समोर असेच उपक्रम आमच्या संस्थामार्फत राबविण्यात येणार असे संस्थेचे अध्यक्ष.राहुल वैरागडे उपाध्यक्ष,चेतन कोकावार,चामोर्शी तालुका प्रमुख सुरज नैताम,उपप्रमुख प्रशांत चुधरी,प्रशांत पालपल्लीवार विशाल बंडावार,देवा तुंबडे ,यांनी सांगितले.