गावातील लोकांच्या हाताला काम मिळाव. - जिल्हा पोलीस अधिकारी जाधव सर
एस.के.24 तास
भंडारा : (मुकेश मेश्राम) लाखनी तालुक्यातील मुरमाडी तूप व नान्होरी येथे स्फूर्ती योजनेअंतर्गत खादी व ग्रामोद्योग आयोग भारत सरकार व त्रिनेत्र कृषी ग्रामीण बहुउद्देशीय शिक्षण संस्था यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या भंडारा फॉरेस्ट लाख प्रोसेसिंग क्लस्टर उपक्रमांतर्गत 15 दिवसीय लाख हस्तशिल्प व उत्पादने निर्माण प्रदर्शनाचे उद्घघाटन माननीय जिल्हा पोलीस अधिकारी जाधव सर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रशिक्षणात ग्रामीण भागातील महिलांना लाखाचे दागिने आणि वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रकल्पाचे उद्देश भंडारा जिल्ह्यात बहुतांश प्रमाणात धानाचे उत्पादन केले जाते धान पिकाबरोबर शेतकऱ्यांनी तसेच वन आच्छादित क्षेत्रात पळस ,बोर व कुसुम प्रजातीचे वृक्ष भरपूर प्रमाणात असून लाखेचे उत्पादन वाढविण्याकरिता क्लस्टर अंतर्गत सामूहिक सुविधा केंद्र द्वारा बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येईल. भंडारा फाँरेस्ट लाख प्रोसेसिंग क्लस्टर मध्ये एकूण चौदा गावे आहेत.धाबेटेकडी, मुरमाडी/तुप, कोलारी, दिघोरी ,नान्होरी ,विहीरगाव ,झरप,खराशी ,मेंढा,रामपुरी ,पळसगाव, दिघोरी मोठी ,किटाळी, रेंगोळा, मांगली या क्षेत्रात घेण्यात आली असून एकूण 515 कलाकुसरांना लाख उत्पादित वस्तूंचे उत्पादन करण्याकरिता प्रशिक्षण उत्पादने वस्तू बनविण्याकरिता साहित्य सामग्री सामूहिक सुविधा केंद्र द्वारा बाजारपेठेची सुविधा उपलब्ध करून देण, गावातील महिला, पुरुष ,युवक ,युवती यांना गावांमध्ये रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे सामाजिक व आर्थिक विकास करून आत्मनिर्भर बनविणे.क्लस्टर मधील लाभ क्षेत्रातील गावांना बरोबर जिल्ह्यातील इतर गावां बरोबर रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देण बाबत उपाय योजना करणे.प्रकल्पाचा होणारे फायदे महाराष्ट्र राज्यात लाखेची सामुहिक तसेच शासकीय बाजारपेठ कुठेही उपलब्ध नाही. क्लस्टर द्वारा सामूहिक सुविधा केंद्र द्वारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तसेच जंगल आच्छादित असणाऱ्या गावातील ग्रामस्थांना लाखेची बाजारपेठ उपलब्ध होईल .परिणामी लाखेचे उत्पादन वाढून आर्थिक परिस्थिती उंचावण्यास मदत होईल .लाख उत्पादित वस्तू बनविण्याकरिता आवश्यक असणारा कच्चामाल सामूहिक सुविधा केंद्रात उपलब्ध होईल. व बाजारपेठ सुद्धा उपलब्ध होणार. लाख लागवडीमुळे वृक्षतोड थांबविण्यास मदत ह़ोईल.
त्रिनेत्र बहुउद्देशीय सेवा संस्थेच्यावतीने खादी ग्रामोद्योगाच्या अंतर्गत भंडारा लाख क्लस्टर लाख निर्मित वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण मुरमाडी तुपकर आणि नान्होरी या दोन गावात सुरू होते .पंधरा दिवस या प्रशिक्षणामध्ये महिलांनी ज्या वस्तू तयार केल्या त्या वस्तूची प्रदर्शनी मुरमाडी येथे करण्यात आली ज्या पुढच्या गावात काम सुरू करायचे आहे. त्या गावातील महिला सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होत्या महिलांनी लाखापासून वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या, नेलपेंट, टिकली ,प्लेट ,कुंडी, बेंगल बॉक्स, तयार केलेल्या या प्रदर्शनीचे उद्घाटक श्री.जाधव सर जिल्हा पोलिस अधिकारी,श्री अभिजित वंजारी पदवीधर मतदार संघ ,श्री. शशिकांत सारसांडे खादी ग्राम उद्योग ,श्री.झाबरमल लाख हस्तशिल्प झारखंड,कु.शुभांगी लोणकर RFOलाखनी,श्री. ताराचंद निरगुडे सरपंच मुरमाडी/तुप.श्री सुमेध मेश्राम सरपंच नान्होरी /दिघोरी ,श्री .सतीश ढोके श्री.राहांगडाले ,श्री .पटले सौ. सरोज मेश्राम .श्री.सागर तेलतुंबडे उपस्थित होते.
गावातील लोकांच्या हाताला काम मिळण्यासाठी अशा क्लस्टर ची खऱ्या अर्थाने गरज असून सामुहिक प्रयत्नातून आर्थिक स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करता येईल असे प्रतिपादन माननीय जिल्हा पोलीस अधिकारी जाधव सर यांनी केले. येथे लाख हस्तशिल्प व निर्मिती प्रदर्शनी उद्धघाटन प्रसंगी ते बोलत होते.