चिचडोह बॅरेज वरील रस्ता प्रवासी ना बारमाही सुरू ठेवावा रस्त्याचे डांबरीकरण व पर्यटन स्थळ करण्यात यावे अशी परिसरातील नागरिकांची मागणी.


 चिचडोह  बॅरेज  वरील रस्ता प्रवासी ना  बारमाही सुरू ठेवावा रस्त्याचे डांबरीकरण व पर्यटन स्थळ करण्यात यावे अशी परिसरातील नागरिकांची मागणी.


एस.के.24 तास


सावली ( सुरेश कन्नमवार ) सावली तालुक्यातील   लोंढोली गावाला दोन किलोमीटर अंतरावर लागून असलेल्या वैनगंगा नदी च्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्हाच्या सीमावर नदी पात्रात  चीचडोह बॅरेज चा मोठा प्रकल्प उभा करण्यात आले आणि गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या  चीचडोह बॅरेज चे   काम आता पूर्ण झालेले असून या बॅरेज ला 38 दरवाजे बसविण्यात आले  आहेत.

चिचडोह बॅरेज हे  विदर्भाची काशी समजलं जात असलेल्या मार्कंडा देवस्थान परिसराला लागून असल्यामुळे या  बॅरेज ला  बघण्यासाठी अनेक जिल्ह्यातील व बाहेरगावाहून लोक दररोज येत असतात. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील लोंढोली. साखरी.हरंबा,उपरी.कापसी.केरोडा.कोंडेखल.व्याहाड. जिबगाव.पेडगाव अशा वीस ते तीस गावाला झाडीपट्टी तिल गावाला व चामोर्शी ला जाण्यासाठी योग्य मार्ग असून गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्याला जाण्याकरिता सध्या प्रवासी दुचाकी.पायदळ. सायकल स्वार चीचडोह बॅरेज च्या  याच रस्त्याचा वापर करीत असल्यामुळे हा रस्ता चोवीस तास व बारामही सुरु असावा.  चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चीचडोह बॅरेज पासून  लोंढोली हे गाव  दोन  किलोमीटर अंतरावर तर  चामोर्शि हे तीन किलोमीटर अंतरवर आहे.


दोन्ही जिल्ह्यातील बाजूने बघितलं तर प्रवाश्याना सोयीस्कर आणि कमी अंतराचा मार्ग आहे.

 लोंढोली. हरंबा. कापसी.उपरी.डोनाळा.कडोली. जिबगाव.केरोडा.कोंडेखल,पेडगाव अशा परिसरातील अनेक गावांना चामोर्शि जवळ पडत असल्यामुळे लोकांना ह्या रस्त्यावरून प्रवास करण पसंद असून वेळ आणि  पैसे बचत होत  असून कमी  खर्चाचे प्रवास आहे.चामोर्शी हे  पाच किलोमीटर तर सावली दूर अंतरावर असल्याने    शिक्षण  घेण्याकरिता विध्यार्थी मुलांना.बाजारपेठेत. व्यावसायिक दृष्टीने  विविध कामासाठी जाण्यासाठी  चामोर्शी हे अगदी जवळ होत असल्यामुळे सावली पेक्षा कमी अंतर असल्यामुळे दळणवळण करण्यासाठी अगदी सोपे मार्ग आहे.

लोंढोली पासून तर चामोर्शी पर्यंत चा असलेल्या कच्चा रस्ता त्याला मजबूत करून त्यावर  डांबरीकरण करण्यात यावे  आणि हा रस्ताबंद न करता  बारमाही चालू ठेवण्यात यावा अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.

 विदर्भाची काशी समजल्या जात असलेल्या मार्कंडा देवस्थान लागून असल्यामुळे चीचडोह  बॅरेज बघण्या करिता अनेक अनेक बाहेरगावाहून लोक येत असतात त्यामुळे बॅरेज जवळ    पर्यटनस्थळ निर्माण करावे. बघण्याकरता येत असलेल्या नागरिकांना बसन्या उठण्यासाठी व मुलाबाळांना खेळण्याकरिता गार्डन व चेअर ची व्यवस्था करण्यात यावी आणि सौंदर्यीकरण करण्यात यावे. अशी  या परिसरातील नागरिकांची मोठी  मागणी आहे.


लोंढोली परिसरात जवळपास मोठया शैक्षणिक सुविधा नसल्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याकरिता चामोर्शि कमी अंतराचे व येण्या जाण्या करिता परवडणारा मार्ग आहे त्यामुळे हा रस्ता बारमाही सुरू ठेवावा अशी मागणी माजी सरपंच दिलीप लटारे यांनी केले आहेत.

दिलीप लटारे - माजी उपसरपंच

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !