महावितरण कडून बेधडक वीज तोडणी.
एस.के.24 तास
भंडारा : ( मुकेश मेश्राम )कोरोना संसर्ग काळात आलेले भरमसाठ विजबिल माफ करावे अशी मागणी सातत्याने होत होती.महावितरणने कठोर भूमिका घेत वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांकडून सक्त वसूली केली आहे.अशा ग्राहकांची बेधडक वीज तोडणी सुरू असून वीज ग्राहकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.विद्युत भारनियमनामुळे देशाचा पोशिंदा शेतकऱ्यांचा जीव टांगणीला असून जीव धोक्यात घालून शेतकरी रात्री बे रात्री सिंचन करीत आहे.शेतकरी जिवाचा आटापिटा करीत असताना शासनही शेतकऱ्यांच्या पराकाष्ठेची परीक्षा पाहू इच्छित आहे.
शेतीसाठी पाणी आणि पाण्यासाठी वीज याविषयी शासनाने नेहमी शेतकऱ्यांना अंधारात ठेवले आहे.अनियमित वीजपुरवठा व कमी अधिक दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी हतबल महावितरण विभागाने आहे.शेतीपंपासाठी दिवसा वीज द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.आधीच शेतकरीवर्ग विद्युत भारनियमानामुळे हतबल झालेला असताना महावितरणकडून थकीत असलेल्या वीज ग्राहकांची बेधडक वीज तोडणी मोहीम जिल्ह्यात सुरू आहे.कोरोना संसर्गाच्या कालावधीत जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती,त्या कालावधीत सर्वसामान्यांसह इतरांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली.त्यावेळी ग्राहकांनी वीजबिल भरले नाही.परिणामी थकीत विज बिलाचा आकडा वाढत गेला.महावितरणने कोरोना काळातील वीजबिल माफ करावे अशी मागणी करण्यात आली होती. त्याकडे महावितरणने दुर्लक्ष केले.त्यातच महावितरणने कठोर भूमिका घेत वीज ग्राहकांची बेधडक वीज तोडणी मोहीम सुरू केली आहे.याचा अनेक ग्राहकांनी विरोधही केला.मात्र,महावितरणने वीज बिल न भरणाया ग्राहकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल असा पवित्रा घेतला. वीज कापली जाऊ नये म्हणून ग्राहकांनी वीजबिल भरण्यास संताप व्यक्त करीत सावकाराच्या दारात उभे राहून काहींनी वीज बिल भरले.महावितरणच्या कठोर भूमिकेला काही गावांमध्ये विरोधही केला.काही गावात मारहाणीच्या घटना देखील घडल्या.तर कुठे तर कुठे घेराव करून कर्मचाऱ्याला नमते घेण्यास बाध्य केले.अनेक ग्राहकांकडे अवाढव्य वीजबिल थकीत असून तेवढी मोठी रक्कम भरणे आवाक्याबाहेरचे आहे.टाळेबंदीनंतर अद्यापही आर्थिक परिस्थिती पूर्ववत झालेली नाही.