रुजू होण्या साठी गेलेल्या हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना परत पाठविले.


 रुजू होण्या साठी गेलेल्या हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना परत पाठविले.


एस.के.24 तास


गडचिरोली : जिल्हा हिवताप अधिकारी यांनी दिलेल्या 15/06/2021 च्या  आदेशानुसार हंगामी क्षेत्र हे दिनांक 18/06/2021 ला सकाळी रुजू होण्याकरिता गेले असता .तालुका आरोग्य अधिकारी , हिवताप निरिक्षक यांनी तुमचे आदेश रद्द झाले आहेत. असे सांगितले तालुका आरोग्य अधिकारी , हिवताप निरीक्षक यांना हंगामी क्षेत्र कर्मचारी यांनी लेखी आदेश आम्हाला दाखविण्या यावा असे म्हटले तेव्हा तालुका आरोग्य अधिकारी ,हिवताप निरीक्षक  यांनी वरिष्ठा कडून तोंडी आदेश असल्यामुळे आम्ही तुम्हाला रुजू करून घेऊ शकत नाही असे सांगितले. त्यामुळे हंगामी क्षेत्र कर्मचारी यांना आल्या पाऊले परत जाव्हे लागले. त्यामुळे हंगामी क्षेत्र कर्मचारी यांच्या वरती खुप मोठा अन्याय झाल्याचे हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गीतेश खेवले यांनी सांगितले.

सन 2015 -16 मध्ये गडचिरोली जिल्हा हिवताप आटोक्यात आणण्यासाठी हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून संचालक (हिवताप)यांच्या आदेशानुसार पद भरती करण्यात आली. या भरती मध्ये 839 लोकांना कामावर नियुक्त करून टप्या टप्याने काम देण्यात आले त्यानंतर मा.जिल्हा अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आदेशा नुसार नवीन हंगामी क्षेत्र कर्मचारी यांना फवारणी साठी आदेशीत केले होते.

 आदेशीत केलेल्या हंगामी क्षेत्र कर्मचारी रुजू होण्यासाठी गेले असता संबंधित तालुका आरोग्य अधिकारी,हिवताप अधिकारी जिल्हा हिवताप अधिकारी यांनी आम्हाला सक्त आदेशीत केले आहे की , हंगामी क्षेत्र कर्मचारी यांना रुजू करून घेऊ नये. अशी माहिती हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष व पदाधिकारी यांनी सांगितले .

येत्या 3 दिवसामध्ये रुजू करून न घेतल्यास तीव्र आंदोनल , आत्मदहन करू असा इशारा हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटनेने दिला आहे.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !