रेती माफियांनी घेतला जीव ! रेतीच्या ट्रॅक्टर मोटर सायकल समोरासमोर धडक एक ठार दोन जखमी.


 रेती माफियांनी घेतला जीव ! रेतीच्या ट्रॅक्टर मोटर सायकल समोरासमोर धडक एक ठार दोन जखमी.


जमावाकडून पोलीस उपनिरीक्षकना धक्काबुक्की.


तलाठी,मंडळ अधिकारी यांना निलंबनाची मागणी.


एस.के.24 तास


भंडारा : (मुकेश मेश्राम ) तालुक्यातील मुरमाडी/ तुप येथे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला आमोरासमोर धडक दिल्याने १ जागीच ठार झाला तर दोघे गंभीर जखमी झाले .ही घटना १९ जून रोजी रात्री ७:४९ ला मुरमाडी येथे घडली.मंगेश उर्फ मन्साराम श्रीराम काळे राहणार मेंढा/भु असे मृतकाचे नाव आहे. तर राष्ट्रपाल हेमराज काळे वय २४ आणि दीपक दुधराम बारसे ३० मेंढा/ भुगाव अशी गंभीर जखमीची नाव आहे.

 

मंगेश काळे हा आपल्या मित्रासह मेंढा वरून मुरमाडी ला मोटरसायकलने येत होता गाडी क्रमांक एम.एच.४८ आर ३४६८ने जात असताना विरुद्ध दिशेने वेगात येत असलेल्या अवैध रेती वाहतूक करण्याऱ्या ट्रॅक्टरने समोरा समोर दुचाकीला धडक दिल्याने या धडकेमुळे डांबरी रस्त्यावर पडून मार लागल्याने मंगेश काळे हा जागीच ठार झाला. आणि त्याचे मित्र हे गंभीररित्या जखमी झाले. गावातील सुज्ञ व्यक्तींनी त्यांना मुरमाडी /तुप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले प्रकृती चिंताजनक असल्याने जागतिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रथम उत्तर देऊन ,डॉक्टर मरस्कोल्हे यांनी पुढच्या उपचाराकरिता भंडारा सामान्य रुग्णालय येथे पाठवण्यात आले .घटनेची माहिती पालांदुर पोलीस स्टेशनला देण्यात आली ही घटना वार्‍यासारखी पसरली गावातील आणि आजूबाजूच्या गावातील ही व्यक्ती घटनास्थळी पोहोचले.


घटनेची माहिती मिळताच सरपंच ताराचंद निरगुडे माजी सभापती सदारामजी देशमुख मेंढा चे सरपंच गोपाल बावणे यांनी भुगाव येथील तलाठी संजय मेश्राम व मंडळ अधिकारी राकेश पंधरे यांच्या आशीर्वादामुळे चुलबंद नदीतील रेती घाट मधून  अवैधरीत्या रेती उपसा व वाहतूक सुरू असल्याचा आरोप यांच्यावर करण्यात आला.त्यामुळे यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली .तसेच पोलीस उपनिरीक्षक वनवे यांना जमावाने धक्काबुक्की केली यामुळे अनुचित घटना टाळण्यासाठी अतिरिक्त पोलीस फोर्स बोलवण्यात आली.घटनास्थळी लाखणी चे नायब तहसीलदार व साकोली उप विभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू घटनास्थळी आल्या ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले मध्यरात्रीपर्यंत लोकांचा जमाव व्हायला सुरवात झाली तब्बल पाच तासानंतर मंगेश चा मृतदेह पोस्टमार्टम पाठवण्यात आला. या प्रकरणाची पालांदुर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात ट्रॅक्टर्स चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !