एक हाथ मदतीचा,आ.बंटी भाऊ भांगडिया यांच्या कडून किराणा किटचे वाटप.
एस.के.24 तास
सावली - ( कमलेश वानखेडे ) तालुक्यातील पाथरी तथा परिसरातील जनतेची कोरोनाच्या संकटाच्या काळात आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. कीर्तिकुमार (बंटी भाऊ ) भांगडिया यांच्या वतीने मदतीचा हाथ पुढे सरसावला असून गरजू कुटुंबियांना किराणा किटचे चिमूर - गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार मा. अशोकजी नेते यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. मा. बंटी भाऊ भांगडिया यांनी फक्त आपल्या क्षेत्रापुरते मर्यादित न राहता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनेक गरजू कुटुंबाना या संकटाच्या काळात मदत केली असून सामान्य लोकांचे मसीहाच आहेत.
या कोरोनाच्या संकटाच्या काळात अनेक व्यावसायिक तथा काम करणाऱ्या मजुरांचे, तथा ऑटो रिक्षा चालविणाऱ्यांचे बेहाल झाले असून आर्थिक स्थिती खूप बिकट झाली आहे. हातावर आणून पोट भरणाऱ्यांवर उपासमरीची पाळी आली आहे.गेल्या वर्षांपासून हाताला काम नाही, व्यवसाय बंद, ऑटो रिक्षा बंद असल्यामुळे मागील वर्षी सुद्धा बंटी भाऊंनी अनेक गरजू कुटुंबाना मदत केली असून या वर्षी सलून व्यावसायिक तथा ऑटो रिक्षा चालक मालक यांना किराणा किटचे वाटप करून दिलासा दिलेला आहे. एक हाथ मदतीचा या उपक्रमातून सावली तालुक्यातील पाथरी येथे खासदार अशोक जी नेते यांच्या हस्ते किराणा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी पाथरी ग्रामपंचायत चे सरपंच सौं अनिता ठिकरे, उपसरपंच श्री प्रफुल तुम्मे, भाजपा तालुका अध्यक्ष श्री अविनाश जी पालं, भाजपा नेते, वसंत वारजूरकर, महामंत्री सतीश बोम्मावार,भाजपा युवा अध्यक्ष तथा नगरसेवक हितेश भाऊ सूचक, माजी उपसभापती तुकाराम ठिकरे, दिलीप ठिकरे, शरद सोनवाने, ग्रामपंचायत सदस्य श्री प्रवीण वाघमारे, सौं अल्का वाघधरे, सौं प्रीती लाडे मिलिंद ठिकरे, तथा मान्यवर उपस्थित होते