निराधार,विधवा,दिव्यांगाचे अनुदान गेल्या ५ महिना पासून टांगणीला ; लाभार्थी झिजवत आहेत बँकेच्या पायऱ्या.


 निराधार,विधवा,दिव्यांगाचे अनुदान गेल्या ५ महिना पासून टांगणीला ; लाभार्थी झिजवत आहेत बँकेच्या पायऱ्या.


एस.के.24 तास


चिमुर : तालुक्यातील नेरी येथील बॅक आॅफ इंडिया बँकेत गेल्या ५ महिन्यांपासून निराधार,विधवा,वृद्ध, दिव्यांग यानां शासनाकडून मिळणाऱे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा झालेच नाही. कोरोना संकट काळात निराधार, वृद्ध, दिव्यांगाच्या अनुदानाला ब्रेक लागल्याने लाभार्थ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. लाभार्थी ५ महिन्यांपासून बँकेत जाऊन अनुदान बँक खात्यावर जमा झालेत काय? अशी विचारणा करीत आहेत. बँकेचे अधिकारी व कर्मचारी याचेकडून अनुदान जमा झाले नाही आता येऊ नका असे उत्तर दिले जाते.

 

काही लाभार्थ्यांनी याची माहिती भारतीय क्रांतिकारी संघटनेचे कैलाश भोयर यानां दिली.कैलास भोयर यांनी भारतीय क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विन कोब्रा,सांरग दाभेकर याचेसह बँक ऑफ इंडिया नेरी येथे भेट दिली.डार्विन कोब्रा यानी बँकेचे मॅनेजरला, लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्यास विंलब का लागतो ? अशी विचारणा केली तर तहसील कार्यालयातून लाभार्थ्यांची हार्ड कॉपी न आल्याचे त्यांनी सांगितले तुरंत तहसील कार्यालयातील संबधित विभाग प्रमुखाला काॅल करून विचारपूस केली व तात्काळ विंलब न करता 15 दिवसात संजय गांधी योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्याची मागणी केली.



बँक ऑफ इंडिया नेरी येथे याआधी सुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्यास बुद्धिपुरसर टाळाटाळ केली जात असते,बँक खातेवहीवर एन्ट्री करून मागीतले तेव्हा त्याचेशी गैरवर्तनूक केल्याचा प्रकार होत असतो असे लाभार्थ्यांचे सांगणे आहे. बँकेचे नियोजनबद्ध काम नसल्याने कित्येक लाभार्थ्यांना दिवसभर बँकेसमोर उभे राहून भर उन्हात प्रतिक्षा करावी लागते आहे हा केविलवाणा प्रकार बँकेच्या निष्काळजीपणामुळे होत असेल तर भारतीय क्रांतिकारी संघटना मूळीच खपवून घेणार नाही आणि 15  दिवसात लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा न झाल्यास क्रांतिकारी स्टाईलने उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा संघटनेचे अध्यक्ष डार्विनकोब्रा यानी दिला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !