आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार – नाना पटोले


आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार – नाना पटोले



एस.के.24 तास

मुल : ( नितेश मँकलवार )आगामी निवडणुका काॅंग्रेसला स्वबळावर लढायच्या असून एकेकाळी काॅंग्रेसचा गड असलेला बल्लारपूर मतदार संघाचा पुढील आमदार हा काॅंग्रेसचा व्हावा या दृष्टीने कार्यकर्त्यांनी संघटनात्मक बांधणीला सुरूवात करावी. असे आवाहन काॅंग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी केले. कोविड परिस्थितीची पाहणी आणि आढावा घेण्याचे निमित्याने आज काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले हे मूल येथे आले असतांना स्थानिक काॅंग्रेस भवनात आयोजीत कार्यक्रमात बोलत होते. थोरामोठयांची परंपरा लाभलेल्या काॅंग्रेसची कृती सदैव प्रामाणीक राहली असून हिंदूच्या चित्ता पेटवण्याचे काम करणा-या चोरांच्या उलटया बोंबा मारणा-या भाजपा सारखी नाही, असे सांगतांना आ. नाना पटोले यांनी तत्कालीन मुख्यमंञ्यानी नागपूर जिल्हा परिषदेची निवडणुक टाळण्यासाठी म्हणून ओबीसी संवर्गाची बिंदू नामावली तयार करण्याचे कारण सांगून ओबीसी आरक्षणात वेळ मारून नेल्याचा आरोप आ. नाना पटोले यांनी केला. कोरोना काळात उत्तम कार्ये करणा-या तालुक्यातील कार्यकर्त्यांनी कौतुक करतांना आ. नाना पटोल यांनी भविष्यात केलेल्या कार्याचा बळावर जनता मतांचा कौल देईल. असा विश्वास व्यक्त केला. यावेळी जिल्हयाचे पालक मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी मार्गदर्शन करतांना पुलवामा सारखे उदाहरण देवून देशाची निवडणुक लढणारी भाजपा येत्या काळात पुन्हा अशीच घटना घडवून निवडणुका जिंकण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगतांना येत्या काळात काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी सजग राहावे. असे आवाहन केले. यावेळी स्थानिक नेतृत्व तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी कोरोना संसर्गाच्या काळात काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या कार्याचा लेखाजोगा सादर केला. यावेळी पदवीधर मतदार संघाचे आ. अँड. अभिजीत वंजारी यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे निमित्ताने प्रांताध्यक्ष आ. नाना पटोल, पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार, आ. अभिजीत वंजारी आणि अतुल लोंढे यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी आमदार देवराव भांडेकर,जि.प.चे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील, बँकेचे संचालक संदीप गड्डमवार, अँड. गोविंद भेंडारकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर अध्यक्ष सुनिल शेरकी यांनी केले. संजय पडोळे यांनी संचलन आणि गुरू गुरनूले यांनी आभार मानले. कार्यक्रमाला तालुक्यातील काॅंग्रेस कार्यकर्ते मोठया संख्येनी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष घनश्याम येनुरकर, राकेश रत्नावार, अखील गांगरेड्डीवार, राजेंद्र कन्नमवार, अशोक येरमे, संदीप कारमवार,सुरेश फुलझेले, विनोद कामडे, पवन निलमवार,विवेक मुत्यलवार,रवि कामडे, संदीप मोहबे,अनवर शेख,व्यंकटेश पुल्लकवार,रूपाली संतोषवार,लिना फुलझेले आदींनी परीश्रम घेतले.
 

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !