नागभिड नगरपरीषद मध्ये अनेक समस्या व रस्त्याची दैनदिन अवस्था.

 

नागभिड नगरपरीषद मध्ये अनेक समस्या व रस्त्याची दैनदिन अवस्था.


एस.के.24 तास


नागभिड : नगर परिषद मध्ये अनेक समस्या आहेत पहीले च रोड लहान आणि पावसाच्या पाण्याने रोडवर  साचलेले गड्डे आणि त्यावरुन जड वहातुक मोठे ट्रक 10,12,14 चक्का ट्रक पण त्याच रोडने गावात शिरतात  त्यामुळे दुचाकी,सायकल,पायदळ येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना होणारा त्रास वसुंधरा कॉलनीला कित्येक वर्ष झाली.पण आतापर्यंत तिथ नाल्या बनल्या नाही सांडपाणी रस्त्यावर वाहतो. यापासुन रोगराई पसरण्याची शक्यता पावसाळ्यात वाढली आहे.

तसेच शिवनगर हा मोठा प्रभाग आहे.या प्रभागात  नाल्या नाहीत.घरातील सांडपानी रस्त्यावर वाहतो. यामुळे गंदगी व दुर्गान्धि  जास्त प्रमाणात वाढली आहे. कारण पहिलेच कोरोना मुळे लोक त्रस्त आहेत.

टोपरे बाबा चौकात पिन्याचा पाण्याची समस्या आहे. तेथील कित्तेक तरी लोक पाणी भरण्यासाठी ब्रम्हपुरी रोड स्टेट बँक नागभीड समोर जो वॉल आहे.तिथुन पाणी प्यासाठी नेतात किवा भरतात तिथ पाणी भरतांना एक घटना पण घडली आहे.

नगर परिषद क्षेत्रात कित्तेकतरी बोरिंग,हातपम्प बंद नादुरुस्त पडले आहे.

या सगळ्या समस्यांचा लवकरात लवकर समाधान निघायला हवा अन्यथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नागभीड कडून तिव्र आंदोलन करण्यात येईल.असा इशारा देण्यात आला आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !