भारतीय क्रांतिकारी संघटनेच्या मागणीला यश; निराधार,विधवा,दिव्यांगाचे अनुदान बँक खात्यावर जमा.

           भारतीय क्रांतिकारी संघटनेच्या मागणीला यश.                  निराधार,विधवा,दिव्यांगाचे अनुदान बँक खात्यावर जमा.

एस.के.24 तास

चिमुर : तालुक्यातील नेरी येथील बॅक आॅफ इंडिया बँकेत गेल्या ५ महिन्यांपासून निराधार, विधवा, वृद्ध, दिव्यांग यानां शासनाकडून मिळणाऱे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यास टाळाटाळ करीत होती. कोरोना संकट काळात निराधार, वृद्ध, दिव्यांगाच्या अनुदानाला ब्रेक लागल्याने लाभार्थ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता. बँकेचे नियोजनबद्ध काम नसल्याने कित्येक लाभार्थ्यांना दिवसभर बँकेसमोर उभे राहून भर उन्हात प्रतिक्षा करावी लागते होते हा केविलवाणा प्रकार बँकेच्या निष्काळजीपणामुळे होत असेल तर भारतीय क्रांतिकारी संघटना मूळीच खपवून घेणार नाही आणि 15  दिवसात लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा न झाल्यास क्रांतिकारी स्टाईलने उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा भारतीय क्रांतिकारी संघटनेचे वतीने संघटनेचे अध्यक्ष डार्विनकोब्रा यानी बँकेचे व्यवस्थापक यानां दिला होता.

          या बाबतीत बँक ऑफ इंडिया नेरी या बँकेने भारतीय क्रांतिकारी संघटनेच्या मागणीची दख्खल घेऊन 15 दिवसात संजय गांधी योजना, श्रावण बाळ योजना व इतर योजनेचे मासिक अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केले यामुळे लाभार्थ्यांना कोरोना काळात आर्थिक दिलासा मिळाला आहे.

       संजय गांधी योजना, श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी दिव्यांग,वृद्ध,विधवा,निराधार महिलांनी आभार मानले.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !