चाकलपेठ ते चामोर्शी रत्याची दुरुस्ती करून वाहतुकीस मार्ग सोयीस्कर करा.
◆ युवा संकल्प संस्था शाखा चामोर्शी यांची आ.डॉ. देवरावजी होळी यांच्याकडे निवेदनातून मागणी.
प्रशांत चुधरी
चामोर्शी : ( प्रशांत चुधरी ) चाकलपेठ ते चामोर्शी रत्याची दुरुस्ती करून वाहतुकीस मार्ग सोयीस्कर व्हावे यासाठी युवा संकल्प संस्था शाखा चामोर्शी यांनी गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ.देवराव होळी यांच्याकडे निवेदनातून मागणी केली आहे चाकलपेठ ते चामोर्शी या मार्गावर खड्डेच खड्डे पडून रस्त्याची दैनावस्था झालेली आहे. मूल - चामोर्शी ला जोडणारा मुख्य मार्ग असताना या मार्गावर पडलेले खडे व रस्त्याची अवस्था ही ये - जा करणाऱ्या नागरिकांना आणि वाहतुकी साठी मोठ्या प्रमाणात अडचण ठरत आहे. तसेच पावसाळा सुरू झाल्यामुळे रस्त्यावर पाणी साचून राहते,अशा परिस्थितीत वाहतूक करणे जिकरीचे होते.या मुख्य मार्गावर रहदारीचे प्रमाण अधिक असल्यामुळे हे खड्डे अपघातास कारणीभूत ठरू शकतात.याची दखल घेता निवेदनातून युवा संकल्प संस्था शाखा चामोर्शी यांनी आमदार डॉ.देवरावजी होळी यांना रत्याची दुरुस्ती करून वाहतुकीस मार्ग सोयीस्कर करावा अशी मागणी केली आहे .
यावेळी युवा संकल्प संस्था शाखा,चामोर्शी च्या वतीने चामोशी प्रमुख सुरज नैताम,उपप्रमुख प्रशांत चुदरी,सदस्य विक्की बारसागडे,ज्ञानेश्वर लटारे उपस्थित होते .