शासनाने पथदिव्याच्या देयकाकरिता तात्काळ अनुदान द्यावे-तालुका सरपंच सेवा संघटनेचे निवेदन.
एस.के.24 तास
भंडारा : (मुकेश मेश्राम ) लाखनी तालुक्यातील ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती डबघाईस आल्याने राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील पथदिव्यांच्या बिज देयका करीता तत्काळ अनुदान उपलब्ध करुन द्यावे व त्या मागणीचे निवेदन ग्रामपंचायत सरपंच सेवा संघ लाखनी तालुक्याच्या वतीने खा.सुनिल मेंढे यांना दिले आहे.सन २०१८ पासून अनेक ग्रामपंचायतीवर लाखो रुपयांचे विजदेयके काढून विजवितरण कंपनीने अचानक पावसाळ्याच्या दिवसात लाखनी तालुक्यातील जवळपास २५ ग्रामपंचायतीच्या विजपुरवठा खंडीत करुन गावांत काळोखपसरविला आहे तसेच बिजपुरवठा खंडीत करने सुरुच आहे.सद्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावरील खड्डे,सांप,विंचू तसेच हिंस्र पशुंचा गावांत प्रकोप वाढलेला आहे.शासनाने जनहिताच्या दृष्टीने जनतेला मूलभूत सुविधांपासून वंचित केले आहे.वास्तविक पाहता महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडून ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती रक्कम लक्षात घेता रस्त्यावरील विजदिव्यांचा विद्युत खर्च भागविण्यासाठी १०० टक्के अनुदान व ग्रामीण पाणीपुरवठा वरील खर्च ५० टवके हे स्थानिक संस्था व पंचायतीराज संस्था यांना नुकसान भरपाईसाठी देणे आवश्यक असून लेखाशिर्ष शक्ती ०४ ला दर्शविणे असे शासनाचे निर्देश आहे.रस्त्यावरील विजेच्या दिव्यांची विज बिलांची देण्यासाठी ग्रामपंचायतीला १०० टक्के अनुदान अजूनपर्यंत शासनाने ग्रामपंचायतीला अनुदान दिले नाही. ग्रामपंचायतीकडील पथदिव्यांवरील विज थकबाकीचे व्याज व दंड ३१ मार्च २०१८ पर्यंत कमी करुन ग्रामविकास विभागाने विद्युत वितरण कंपनीला जमा करावे असे स्पष्ट निर्देश असतांना सुध्दा शासनाने पथदिव्याच्या विजबिलाची रक्कम देऊन भरले नाही.इतकेच नव्हेतर केंद्र सरकार कडून ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधितील जिल्हा परिषदेने दहा टक्के ब पंचायत समितीने १० टक्के रक्कम कपात करुन सुध्दा ग्रामीण भागातील जनतेला अंधारात आपले जीव धोक्यात घालावे लागते.ग्रामपंचायत हद्दीमधील पथदिव्यांचे विजदेयक भरण्यासाठी ग्रामपंचायतीला अनुदान देण्यात यावा किंवा जिल्हा परिषदेने विज देय भरावा.याबाबत निवेदन खा.सुनिल मेंढे तसेच माजी मंत्री आ.डॉ.संजय कुटे यांना सरपंच संघनेमार्फत देण्यात आले.निवेदन देतेवेळी लाखनी तालुका सरपंच संघटना अध्यक्ष म.वा.बोळणे,पंकज चेटुले,पोहरा सरपंच रामलाल पाठनकर,बाळा शिवणकर आदी उपस्थित होते.