पाथरी येथे मोफत बी.पी व शुगर तपासणी.
पाथरी तालुका निर्माण संघर्ष कृती समिती,
संजीवनी क्लिनिक तथा स्थानिक आरोग्य विभागाचा स्तुत्य उपक्रम.
एस.के.24 तास
सावली : कोरोनाच्या संकटाच्या काळात पाथरी येथील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे या करिता अविरत प्रयत्न करीत असून आज ग्रामपंचायत परिसरात नागरिकाच्या आरोग्याच्या दृष्टीने पाथरी तालुका निर्माण संघर्ष कृती समिती, संजीवनी क्लिनिक, व स्थानिक आरोग्य विभाग यांच्या वतीने बी.पी.व शुगर ची मोफत तपासणी करण्यात आली, तपासणी करण्यासाठी डॉक्टर बन्सोड साहेब (एम.बि.बि.एस ) डॉक्टर मडावी साहेव ( एम.बि.बि.एस )डॉक्टर गेडाम साहेब (एम.बि.बि.एस ) आरोग्य सेविका सौ,सहारे व आशा वर्कर यांनी सहकार्य केले.या वेळी पाथरी तालुका निर्माण संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष तथा विद्यमान उपसरपंच प्रफुल तुम्मे, विद्यमान सरपंच सौ,अनिता ठिकरे,राकेश चेन्नूरवार,नितीन अढिया,उमाजी भैसारे, अशोक वरखडे, राकेश कोहळे उपस्थित होते.