दुकानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत; जिल्हाधिकारी संदीप कदम.
एस.के.24 तास
भंडारा : (मुकेश मेश्राम)राज्यामध्ये कोरोना ची आकडेवारी कमी झाल्यानंतर शासनाने ५ टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल केले होते...मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच कोरोना बाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे समोर येत आहे...तसेच राज्यात डेल्टा प्लस चा धोका देखील वाढू लागला असून राज्यातील काही जिल्ह्यात सदर संसर्गाचे रुग्ण आढळून आलेले आहेत...त्यामुळे राज्य शासनाकडून या आधीच्या नियमावलीमध्ये बदल करण्यात आले आहेत...त्यामध्ये अत्यावश्यक वस्तू व सेवा बाबतचे दुकाने दररोज (रविवार ते शनिवार) सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजता पर्यंत सुरू ठेवता येतील....चित्रपटगृहे नाट्यगृहे पूर्णतः बंद राहतील...उपाहारगृहे हॉटेल खानावळी सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजता पर्यंत 50% क्षमतेने सुरू ठेवता येतील...शुक्रवारी सायंकाळी 4 ते सोमवार सकाळी 7 वाजता पर्यंत पूर्णतः बंद ठेवण्यात यावे..खाजगी आस्थपणा कार्यालय सर्व खाजगी अस्थापना या सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 वाजता पर्यंत सुरू ठेवता येतील...सदर नियम हा खाजगी बँका विमा कार्यालय औषधे निर्माण करणारी कंपनी व संबंधित आस्थापना सूक्ष्म वित्तसंस्था वगैरे बँकिंग वित्तसंस्था यांचे कार्यालयांना लागू राहणार नाही....शासकीय कार्यालय 50% क्षमतेने सुरू राहतील...विवाह सोहळा ५० लोकांच्या कमाल मर्यादेत परवानगी असेल...अंत्यविधीसाठी 20 लोकांच्या कमाल मर्यादेचे परवानगी असेल..सभा,,निवडणुका,,,,,स्थानिक प्रधिकरण व सहकारी संस्थांची आमसभा 50% क्षमतेसह सुरू राहतील....ई कॉमर्स नियमित सर्व वेळ सुरू ठेवता येतील जमावबंदी व संचारबंदी जमावबंदी सकाळी 6 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी सायंकाळी 5 ते सकाळी 6 वाजता पर्यंत असेल आदेशाचे पालन न करणारी /उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती संस्था अथवा समुह यांनी साथरोग प्रतिबंध कायदा 1897 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005...तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188,269, 270, 271 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल.