मुल शहर काँग्रेसच्याअध्यक्ष पदी सुनिल शेरकी यांची नियुक्त.
◆ शहर काँग्रेसची कार्यकारीणी घोषीत.
एस.के.24 तास
मुल : ( नितेश मँकलवार ) काॅंग्रेस पक्षाचा प्रचार व प्रसार करण्याचे उद्देशाने प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या सुचनेनुसार मूल शहर काॅंग्रेस पार्टीच्या कार्यकारीणीची निवड करण्यांत आली. निवडण्यांत आलेल्या कार्यकारीणीत मूल शहर काॅंग्रेस पार्टीचे अध्यक्ष म्हणून ओबीसी चळवळीचे खंदे कार्यकर्ते तथा सिनेट सदस्य सुनिल शेरकी यांची एकमताने निवड करण्यांत आली. उपाध्यक्ष पदावर नगरसेवक विनोद कामडे, सुरेश फुलझेले, संदीप मोहबे, महासचिव पदावर कैलास चलाख तर कोषाध्यक्ष म्हणून दिनेश जेड्डीवार यांची निवड करण्यांत आली.
निवडण्यात आलेल्या उर्वरीत कार्यकारीणीत सचिव-निकेश सुकदेवे,संघटक-किशोर मोहुर्ले,अल्पसंख्याक सेल संघटक अनवर शेख, प्रसिध्दी प्रमुख,नितेश मँकलवार आणि विवेक मुत्यलवार,बुथ प्रमुख रवि चौधरी आणि राकेश मोहुर्ले,वार्ड प्रमुख रंजीत आकुलवार,संतोष वाढई,पंकज महाजनवार, राजेश ठाकरे,पंकज शेंन्डे,निखील भोयर, जगदिश मोहुर्ले,तुलाराम घोगरे यांची निवड करण्यांत आली.निवडण्यांत आलेल्या नवनियुक्त कार्यकारीणी पदाधिका-यांना जिल्हयाचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांचे हस्ते नियुक्ती पत्र देवून अभिनंदन करण्यांत आले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष रावत, काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा बाजार समिती सभापती घनश्याम येनुरकर,संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अध्यक्ष राकेश रत्नावार,बाजार समिती उपसभापती संदीप कामवार,संचालक तथा सरपंच,अखील गांगरेड्डीवार,शांताराम कामडे,युवक काॅग्रेसचे तालुका महासचिव व्यकंटेश पुल्लकवार,जेष्ठ कार्यकर्ते हरीहर बेलसरे आदि उपस्थित होते.