वनपरिक्षेत्र अधिकारी,कामडी यांनी परीवारा सोबत घेतले देवटोक येथे उत्खनात निघालेल्या शिवपिंडी चे दर्शन.
एस.के.24 तास
सावली : तालुक्यातील वैनगंगा नदीच्या उत्तर वहिनीच्या काठावर असलेल्या देवटोक येथे दिनांक 25 ला सायंकाळी 6 च्या दरम्यान नवीन मंदिर बांधकाम करण्यासाठी कॉलम चे जेसीपी च्या खोदकाम करीत असतानाच जवळपास अंदाजे 5 फूट लांबी व 1 फूट उंच ची पुरातन शिवपिंडी आढळून आली. त्या शिव पिंडी ची विधीवत पूजा करण्यात आली.शेकडो लोकांनी ही शिवपिंडी पाहण्यासाठी गर्दी केली होती. आज दिनांक 1 जून 2001 ला सकाळी सावली वनपरिक्षेत्र अधिकारी कामडी यांनी आपल्या आई सोबत देवटोक येथे भेट देत पाहणी केली. व पूजा अर्चना केली.यावेळी समवेत ग्रा.प. सदस्य राकेश गोलेपल्लीवार,श्री पुण्यभूमी तीर्थक्षेत्र मुरकुंडेश्वर देवस्थान ट्रस्ट देवटोक(शिर्शी) चे अध्यक्ष संत, मुर्लीधर महाराज याचे सह अनेक मंडळी उपस्थित होते.