कामगारांच्या सेफ्टी संदर्भात अधिकाऱ्यांसह कंपनी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका तरुणाचा मृत्यू. ◆ अधिकाऱ्यांनी फक्त AC रूम मधूनच नव्हे तर प्रत्यक्ष कंपनीमध्ये जाऊन कामगारांना न्याय मिळवून द्यावा! जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांची चेतावनी.

कामगारांच्या सेफ्टी संदर्भात अधिकाऱ्यांसह कंपनी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका तरुणाचा मृत्यू.


◆ अधिकाऱ्यांनी फक्त AC रूम मधूनच नव्हे तर प्रत्यक्ष कंपनीमध्ये  जाऊन कामगारांना न्याय मिळवून द्यावा! जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांची चेतावनी.


एस.के.24 तास


चंद्रपूर : सविस्तर वृत्त असे की दिनांक:- २९/०६/२०२१ रोजी दुपारला मुरली (दालमिया) सिमेंट कंपनीमधील कामगार नाव:- संतोष चव्हाण गाव- नांदा फाटा ता. कोरपना येथिल युवक कंपनीमध्ये काम करीत असतांना ३० फूट उंचीवरून खाली पडल्याने उपचाराकरता घेऊन जात असताना मृत्यू पावलाने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ३० फूट उंचीवर काम करीत असणाऱ्या कामगाराच्या सेफ्टी बाबत कंपनीने काहीच केले नसल्यामुळे कंपनी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे संतोष चव्हाण याचा आज जीव गेला. याला संपूर्णतः कंपनी प्रशासन जबाबदार असल्यामुळे सेफ्टी संदर्भात नियोजनाअभावी ही घटना घडलेली आहे. जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी युवा स्वाभिमान पार्टी चंद्रपूर तथा जय भवानी कामगार संघटना चंद्रपूर तर्फे वारंवार प्रशासनाला निवेदन व तक्रार देऊन देखील प्रशासन हे निरीक्षणाच्या माध्यमातून सेफ्टी बाबत गंभीर नसल्यामुळे आज ही घटना घडली आहे. क्षेत्रीय कामगार कार्यालयाने या सर्व कंपन्यांमध्ये सेफ्टी चे वेरिफिकेशन करणे अत्यावश्यक आहे. हे काम जर त्यांच्या अधिकाराअंतर्गत येत नसेल तर कार्यालयाने आपल्या माध्यमातून संबंधित विभागाला याबाबतच्या सूचना अथवा विनंती करून भविष्यात परत अशी घटना घडू नये याकरिता सदर कंपनीसह इतरही कंपन्यांमध्ये कामगारांचे सेफ्टी तथा इतरही समस्या बाबत इन्स्पेक्शन करणे अत्यावश्यक असल्यामुळे क्षेत्रीय श्रम कार्यालयाद्वारे इन्स्पेक्शन करण्यात यावे व मुरली सीमेंट मध्ये आजच्या झालेल्या घटनेबाबत जबाबदार अधिकाऱ्यांवर - व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व मृतक कुटुंबियांना न्याय देण्यात यावा अशी मागणी जिल्हाध्यक्ष सुरज  ठाकरे यांनी  निवेदनाद्वारे तथा चर्चेच्या माध्यमातून अधिकाऱ्यांशी केली. या आधी देखील अशा प्रकारच्या बऱ्याचशा घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वत्र कंपन्यांमध्ये झालेल्या आहेत तरी देखील कामगारांच्या सुरक्षिततेबाबत उद्योगपती/कंपनी प्रशासन जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करीत असते, त्याचे मूळ कारण म्हणजेच संबंधित कार्यालयातील अधिकारीच उद्योगपतींच्या ताटाखालचे खालचं मांजर बनल्यामुळे कंपनी प्रशासन कायदा-सुव्यवस्थेचे भान न ठेवता स्वतःचाच मनमर्जी कारभार कंपनीतील कामगारांवर करीत असण्याचे प्रकार याआधी देखील  समोर आलेले आहेत.  भविष्यात जर कंपनी प्रशासनाचा बेकादेशीर मनमर्जी कारभार संबंधित विभागाकडून थांबविण्यात आला नाही तर युवा स्वाभिमान पक्ष चंद्रपूर व जय भवानी कामगार संघटनेला आंदोलनाचा पवित्रा हाती घ्यावा लागेल अशी चेतावणी जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी दिली.

अधिकाऱ्यांनी कायदा सुव्यवस्था राखून ठेवण्याची दक्षता घेऊन कामगारांबाबत माणुसकी बाळगून AC रूमच्या बाहेर पण निघून प्रत्यक्ष कंपनीमध्ये निरीक्षण तथा पडताळणी करून समस्या मार्गी लावून भविष्यात होणारे अपघात टाळण्याकरिता जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी निवेदनासह चर्चेच्या माध्यमातून संबंधित अधिकारी यांना सांगितले.



 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !