मका खरेदीची ऑनलाईन सेवा बंद शेतकरी संकटात 30 जून अंतिम तारीख.
एस.के.24 तास
भंडारा : ( मुकेश मेश्राम ) मका खरेदीची परवानगी शासनाने दिल्यानंतरही नोंदणीची ऑनलाईन व्यवस्था खुली न झाल्याने शेतकरी नोंदणी करू शकले नाही. नोंदणीकरिता खरेदी विक्री केंद्रात ये जा करीत थकलेले आहेत.पंधरा दिवसाच्या वर कालावधी होऊ नही मंत्रालयातून अजून पर्यंत ऑनलाईन सेवा उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकरी विवंचनेत सापडलेला आहे.
लाखनी आणि लाखांदूर तालुक्यात शासनाने मका खरेदीचे आदेश दिले आहेत.मका खरेदीची किंमत 1850 आधारभूत ठेवण्यात आली आहे.जिल्हात सुमारे 400 हेक्टर मक्याची लागवड करण्यात आली होती एकट्या लाखनी तालुक्यात 82 हेक्टर वर मक्याची लागवड करण्यात आली त्यामध्ये लाखनी तालुक्यातील चुलबंद खोऱ्यातील मरेगाव येथे 60 शेतकऱ्यांनी मका पिकाचे उत्पादन घेतले कृषिप्रधान देशात अन्नदाता संकटात सापडलेला आहे.पीक कोणतं घ्या,मात्र विक्रीकरिता समस्या समस्या उभ्या आहेत.धान मका यासारखी इतरही आधारभूत केंद्राचा आधार मिळाल्यावरही विक्रीकरिता नानाविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. भंडारा जिल्ह्यात तडफदार नेते असूनही जिल्ह्यातील शेतकरी संकटात आहे.शेतकऱ्यांच्या विकासासाठी आम्ही तत्पर असल्याची ग्वाही मंचावरून दिले जाते.मात्र प्रत्यक्षात असलेल्या समस्यांना वेळेत न्याय मिळत नाही.त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या आश्वासनावर शेतकरीवर्ग नाराज आहे.अथक श्रम करून शेतमाल पिकविला जातो. नगदी उत्पादन खर्च करून आधार केंद्राद्वारे विकण्याचा प्रयत्न शेतकरी करतो.परंतु प्रशासनातील वरिष्ठ स्तरावरून पारदर्शकपणा नसल्याने शेतकन्यांची कुचंबना होत आहे. स्थानिक किंवा जिल्हा स्तरावरून चा प्रशासन अधिकारी कमी पडत असल्याने वेळेत समस्या मार्गी लागत नाही.त्यामुळे एका समस्येतून दुसरी समस्या निर्माण होत समस्यांचे जाळे तयार होते.मका खरेदी केंद्रात शेतकरी जाऊन थकला असून नोंदणी झाली नसल्याने विक्री कशी होणार ? असा प्रश्न शेतकऱ्याला निर्माण झालेला आहे.