रब्बी धान खरेदी ची 30 जून ची असलेली मुदत मुदत वाढवा. शेतकऱ्यांची एकमुखी मागणी.


 रब्बी धान खरेदी ची 30 जून ची असलेली मुदत मुदत वाढवा. शेतकऱ्यांची एकमुखी मागणी.


एस.के.24 तास


भंडारा : (मुकेश मेश्राम) आधारभुत धान्य खरेदी केंद्रावर अजून पर्यंत 25 टक्के सुद्धा धानाची खरेदी न झाल्यामुळे धान खरेदी ची 30 जून पर्यंत असलेली मुदत वाढवण्याची एकमुखी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

 जिल्हातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम 2021 मध्ये मोठ्या प्रमाणावर रब्बी धानाची लागवड केली होती.या रब्बी धानाला आधारभूत धान खरेदी केंद्रावर रुपये 1868 एवढा हमीभाव मिळतो.याच धानाची बाजार भावात किंमत तेराशे ते साडे तेराशे रुपये प्रतिक्विंटल असते.

 आधारभुत धान्य खरेदी केंद्रावर धान्य आला जास्त रेट मिळत असल्यामुळे आपले धान्य शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर विकले जावे अशी प्रत्येक शेतकऱ्याची प्रामाणिक इच्छा असते.

मात्र शासन या ठिकाणी मोठी चूक करत असते. आधारभूत धान खरेदी केंद्रावर जलदगतीने धान खरेदी केली जात नाही. या ना त्या कारणाने धान खरेदी बंद पडत असते. कधी बारदान याचा प्रश्‍न तर कधी धान्य साठवणुकीच्या जागेचा प्रश्न यामुळे धान खरेदी ला खूप उशीर होत असतो.त्यातच 30 जून पर्यंत धान खरेदी करा ही डेडलाइन असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे धान खरेदी होईल याची शाश्वती नाही.

 परिणामी धान खरेदी केंद्रावर धान्य विकले जाईल असे आस ठेवून बसलेल्या शेतकऱ्याला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतो.

 यामुळे जर शासनाला धान खरेदी करताना उशीर होत असेल तर 30 जून पर्यंत असलेली डेडलाईन वाढवण्यात यावी असे एकमुखी आणि रास्त मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !