एस.के.24 तास चा दणका... अखेर "त्या" पोलिस उपनिरीक्षकाचे तडकाफडकी स्थानांतर. ◆ रेती तस्करांना अभय देणे आले अंगलट. ◆ प्रकरण मुरमाडी/तूप येथे रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ने दुचाकीस धडक दिल्याचे. ◆ एस.के.24 तास ला लागली होती बातमी...

एस.के.24 तास चा दणका...


 अखेर "त्या" पोलिस उपनिरीक्षकाचे तडकाफडकी स्थानांतर.


◆ रेती तस्करांना अभय देणे आले अंगलट.


◆ प्रकरण मुरमाडी/तूप येथे रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ने दुचाकीस धडक दिल्याचे.


◆ एस.के.24 तास ला लागली होती बातमी...


एस.के.24 तास


भंडारा : ( मुकेश मेश्राम )लाखनी तालुक्यात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीस धडक दिल्याने १ इसम जागीच ठार झाला होता.तर २ गंभीर जखमी झाल्याची घटना १९ जून रोजी रात्री ८ वाजता चे सुमारास मुरमाडी/तूप येथे घडली होती. चौकशी कामी आलेल्या पोलिस पथकातील एका पोलिस उपनिरीक्षकास रेती तस्करांना अभय दिल्याचे संशयावरून जमावाने धक्काबुक्की करण्यात आली होती.या घटनेची तत्काळ दखल घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव यांनी त्या पोलिस उपनिरीक्षकाचे पालांदूर वरून लाखनी येथे तडकाफडकी स्थानांतरण केल्याने रेती तस्करांना अभय देणे आले अंगलट अशा तालुक्यात चर्चा होत आहेत.

             तालुक्याचे पूर्व सीमेवरून प्रवाहित होणाऱ्या चुलबंद नदीखोऱ्यातील भूगाव,विहीरगाव,पळसगाव , नरव्हा,पाथरी व मरेगाव हे रेतीघाट पालांदूर पोलिस ठाण्याचे हद्दीत येतात. पण रेती घाटाचे लिलाव झाले नसल्याने महसूल व पोलिस विभागातील अधिकारी , कर्मचाऱ्यांचे रेती तस्करांशी अर्थपूर्ण संबंधामुळे खुलेआम नदी घाटातून अवैध रेती उपसा व वाहतूक सुरू होती. रेती तस्करांना या पोलिस उपनिरीक्षकाचे अभय असल्याचा मुरमाडी/तूप परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोक प्रतिनिधींना संशय होता.अचानक १९ जून रोजी रात्री ८ वाजता दरम्यान अवैध रेती वाहतूक करणाऱ्या अज्ञात ट्रॅक्टरने दुचाकीस समोरासमोर धडक दिल्याने मंगेश उर्फ मंसाराम काळे(४०) रा. मेंढा/भूगाव हा जागीच ठार झाला. तर राज्यपाल काळे(२४) आणि दीपक बारसे(३०) रा. मेंढा हे जबर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पालांदूर पोलिस ठाण्याच्या एका पोलिस उपनिरीक्षकाचे नेतृत्वात पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी घटनास्थळावर जमाव जमला होता. पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध रेती वाहतूक सुरू असल्याच्या संशयावरून जनक्षोभ उसळल्याने या पोलिस निरीक्षकास धक्काबुक्की करण्यात आली. तथा मुरमाडी/तूप चे सरपंच ताराचंद निरगुळे , माजी सभापती सदाराम देशमुख , मेंढा चे सरपंच गोपाल बावणे यांचे नेतृत्वात भूगाव चे तलाठी संजय मेश्राम व मुरमाडी/तूप चे मंडळ अधिकारी राकेश पंधरे यांना निलंबित करा. तथा या पोलिस उपनिरीक्षकावर कारवाई करावी. अशी मागणी करून मृतदेह उत्तरीय परिक्षणासाठी नेण्यास मज्जाव करण्यात आला. शांतता व सुव्यवस्था बिघडू नये.              याकरिता अतिरिक्त पोलिस कुमक बोलावण्यात आली. 

          लाखनी चे नायब तहसीलदार दोनोडे व प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी रीना जनबंधू यांनी गावकऱ्यांच्या मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पोहचविण्याचे आश्वासन दिल्याने जमाव शांत होऊन ४ ते ५ तासानंतर मृतदेह शव परिक्षणासाठी पाठविण्यात आला. या घटनेची जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव यांनी तत्काळ दखल घेऊन त्या पोलिस उपनिरीक्षकाचे पालांदूर वरून लाखनी पोलिस ठाण्यात तडकाफडकी स्थानांतरण केले. ही बाब माहिती होताच रेती तस्करांना अभय देणे आले अंगलोट अशा चर्चा होत आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !