लाखनी तालुक्यातील आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात व्हेेंटिलेटर उपलब्ध करा. - रुपाली मेश्राम
नरेंद्र मेश्राम एस.के.२४ तास जिल्हा प्रतिनिधी,भंडारा
लाखनी : तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना चे रुग्ण आढळून येत आहे .आता तर ग्रामीण भागातही कोरोना विषाणू ने आपले पाय पसरले आहेत. सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे .अशाच जिल्ह्याच्या ठिकाणी रुग्णांना बेड मिळत नाही .ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे.त्यामुळे उपचाराअभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे. भविष्यात कोरोना चा उद्रेक वाढण्याची शक्यता आहे. दवाखान्यात होणारी गर्दी टाळण्यासाठी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर व ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावेत .अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे तालुका संघटक रूपाली मेश्राम यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व भागातील रूग्णालयात उपचारासाठी धाव घ्यावी लागत आहे.वाटेतच रुग्णांना उपचारा अभावि आपले प्राण गमवावे लागत आहे.कुणाला रुग्णालयात जाऊन व्हेंटिलेटर व ऑक्सिजन अभावी आपल्या प्राणाला मुकावे लागत आहे. आणि आता तर खेड्यापाड्यातील सुद्धा रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने बऱ्याचदा रुग्णाला उपचारासाठी शासकीय वाहन उपलब्ध होत नाही.तसेच कोरोनाच्या धास्तीने खाजगी वाहन शहरापर्यंत जात नसल्याने रुग्ण अखेरचा श्वास वाटेत सोडत आहेत. दुसऱ्या लाटेचा संक्रमण रोखण्यासाठी तसेच उपाय योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी आजच नियोजन करणे काळाची गरज झाली असल्याने तेव्हा शासनाने व प्रशासनाने तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना व्हेंटिलेटर व ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आपल्या मार्फत रिपब्लिकन सेनेची संघटक रूपाली मेश्राम यांनी केली आहे.